तळेगावात आढळली पुरातन विहीर

तळेगावात आढळली पुरातन विहीर

तळेगाव स्टेशन - येथील गावतळ्याच्या सुशोभीकरणासाठी गाळ काढताना करण्यात आलेल्या उत्खननादरम्यान पुरातन विहीर आढळली आहे. 

तांबड्या मातीच्या बारीक विटांचे चुन्यातील बांधकाम आणि त्याखाली साधारणतः सात फूट खोल खोदाई आहे. पाणी शेंदण्यासाठी पोहरा तसेच मोट हाकण्यासाठी दगडांची व्यवस्था केलेली आढळते. आडात जलस्रोत आहे. तळ्याचा इतिहास पाहता ही विहीर साधारणतः शतकापूर्वीची आणि शेतातील पाणी व्यवस्थेची विहीर असावी, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. या विहिरीचे जतन करण्यात येणार असल्याची माहिती तळे सुशोभीकरण समितीचे समन्वयक गिरीश खेर यांनी दिली. ही विहीर पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com