पैसे मागण्याच्या कारणावरुन मोठ्या भावाने केला लहान भावाचा खुन

दारुच्या आहारी गेलेल्या लहान भावाकडून सतत पैसे मागण्यामुळे कंटाळलेल्या मोठ्या भावाने लहान भावाचा पंख्याच्या पात्याने वार करुन खुन केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला.
Murder
MurderMurder

पुणे - दारुच्या आहारी गेलेल्या लहान भावाकडून सतत पैसे मागण्यामुळे कंटाळलेल्या मोठ्या भावाने लहान भावाचा पंख्याच्या पात्याने वार करुन खुन केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला. हि घटना हडपसर परिसरातील पंधरा नंबर चौकाच्या परिसरात घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी मोठ्या भावाला अटक केली आहे.

बाबू उर्फ प्रदीप शिवाजी गवळी ( वय 23 रा, 15 नंबर, हडपसर, मुळ रा.तुळजापूर ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मनोज शिवाजी गवळी (वय 28) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरवी नितीन श्रीरंग बनसोडे ( वय 32 रा. लक्ष्मी कॉलनी, हडपसर ) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Murder
व्याजाच्या पैशांची परतफेड केल्यानंतरही दुप्पट पैशांची मागणी करणाऱ्यास अटक

हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप व मनोज हे दोघेही सख्खे भाऊ आहेत. दोघेही हडपसरमधील 15 नंबर परिसरात खोली भाड्याने घेऊन एकत्र राहात होते. प्रदीप हा रिक्षा चालविण्याचे काम करीत होता. तर मनोज हा खासगी ट्रॅव्हल्स बससाठी प्रवासी शोधण्याचे काम करीत आहे. मनोजच्या पत्नीला प्रदीपचे घरी राहणे आवडत नव्हते. त्यावरुन मनोज व त्याच्या पत्नीमध्ये सातत्याने वाद सुरू होते. सातत्याने होणाऱ्या वादाला कंटाळून मनोजची पत्नी गावाला निघून गेली होती. प्रदीपला दारुचे व्यवसन होते, त्यातुनच तो दारु पिण्यासाठी मनोजकडे सतत पैशांची मागणी करीत होता.

प्रदीपचे दारुचे व्यसन व बाहेरख्याली वर्तनामुळे मनोज कंटाळला होता. प्रदीप सोमवारी रात्री खोलीमध्ये झोपला होता. त्यावेळी मनोजने मध्यरात्रीच्या सुमारास घरातील पंख्याच्या पात्याने प्रदीपचा गळा कापून त्याचा खुन केला. हि घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. त्यानंतर हडपसर पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला. त्यानंतर पोलिसांनी मनोजला अटक केली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com