Motivation News : विशेष मुलांच्या ऑलिंपिक पॉवरलिफ्टिंगमध्ये हडपसरच्या चिंतामणीची सुवर्ण मोहोर

मलेशियातील जोहर बहरू येथे झालेल्या 'आयपीएफ वॉल्ड स्पेशल ऑलिंपिक पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२३' मध्ये येथील चिंतामणी राऊत याने भारताचे प्रतिनिधित्व करीत सुवर्णपदक पटकावले.
Chintamani Raut
Chintamani Rautsakal

हडपसर - मलेशियातील जोहर बहरू येथे झालेल्या 'आयपीएफ वॉल्ड स्पेशल ऑलिंपिक पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२३' मध्ये येथील चिंतामणी राऊत याने भारताचे प्रतिनिधित्व करीत सुवर्णपदक पटकावले आहे. सत्तावीस देशातील विशेष खेळाडूंनी या ऑलिंपिकमध्ये सहभाग घेतला होता.

आशियाई सब ज्युनिअर, ज्युनिअर, ओपन आणि मास्टर्स स्पेशल ऑलिंपिक पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत चिंतामणी राऊत ९३ किलो वजनी गटातून उतरला होता. प्रत्येक वेळी त्याने उत्कृष्ट प्रदर्शन करीत सुवर्णपदकावर भारताची मोहर उमटवली. टी.बाकीराज आणि टी.विशाल हे त्याचे प्रशिक्षक आहेत. त्याने मिळववलेल्या या यशामुळे सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.

चिंतामणी हा विशेष मुलगा आहे. त्याचे भवितव्य घडविण्यासाठी त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्य प्रयत्न करीत आहेत. वडील बाळासाहेब, आई रूपाली, बहिण ऋतुजा, कादंबरी व मावसबहीण अस्मिता फुले हे त्याचा सराव घेण्यासाठी दररोज पाहटेपासून मैदानावर येत असतात. त्याच्या सरावासाठी हे सर्वजण आळीपाळीने पद्दुचेरी येथे राहून चिंतामणीला स्पेशल पॉवरलिफ्टींग खेळाडू म्हणून तयार करीत आहेत. प्रशिक्षक टी. बाकीराज आणि टी. विशाल यांचे त्यासाठी मार्गदर्शन मिळत आहे.

'चिंतामणीला आजपर्यंत विशेष मुलांच्या ज्या ज्या स्पर्धेत उतरविले, त्या प्रत्येक स्पर्धेत त्याने यश संपादन केले आहे. दोन महिन्यांपूर्वी झारखंड येथे विशेष मुलांसाठी झालेल्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत त्याने सुवर्णपदक मिळविले आहे. मानाच्या ऑलम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक मिळविण्यापर्यंत आम्ही सर्व प्रकारचे वाटेल ते कष्ट करण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे यापुढेही नक्कीच यश मिळवू, अशी भावना चिंतामणीचे वडील बाळासाहेब राऊत यांनी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com