दुबई दौऱ्यावरून आलेल्या सात तरुणांची ओमिक्रॉन चाचणी पॉझिटिव्ह

दुबई दौऱ्यावरून आलेल्या नारायणगाव व वारूळवाडी येथील सात तरुणांची ओमिक्रॉन चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
Omicron Virus
Omicron Virusesakal

नारायणगाव - दुबई दौऱ्यावरून (Dubai Tour) आलेल्या नारायणगाव व वारूळवाडी येथील सात तरुणांची (Youth) ओमिक्रॉन चाचणी (Omicron Test) पॉझिटिव्ह आली आहे. या रुग्णांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांनी दिली.

नारायणगाव येथील दोन व वारूळवाडी येथील पाच असे सात मित्र दुबई येथे गेले होते. या तरुणांचा घशातील द्रव १३ डिसेंबर रोजी तपासणी साठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुणे येथे पाठवण्यात आले होते. आज सायंकाळी तपासणी अहवाल येथील आरोग्य केंद्राला प्राप्त झाला. त्या नंतर तातडीने या रुग्णांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.संबधीत तरुणांची ओमिक्रॉन चाचणी पॉझिटिव्ह आली असली तरी त्यांना अद्याप कोणताही आरोग्य विषयक त्रास होत नसल्याचे येथील वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.

Omicron Virus
डेल्टा व ओमिक्रॉनमधील फरक ओळखण्यासाठी भारतीय बनावटीचा चाचणीसंच विकसित

खबरदारीचा उपाय म्हणून मागील पाच दिवस या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. या तरुणांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरटी-पीसीआर चाचणी करून घ्यावी. तसेच संबंधित व्यक्तींनी चाचणी अहवाल प्राप्त होईपर्यंत विलगीकरण करून घ्यावे. असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. गुंजाळ यांनी केले आहे. ओमिक्रॉनचा शिरकाव ग्रामीण भागात झाल्याने चिंता व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com