'सबकी रासोई' उपक्रमाच्या माध्यमातून दररोज दीड लाख जेवणाचे पॅकेट 

One and a half lakh packets of food packets every day are delivered through the Sabki rasoi.jpg
One and a half lakh packets of food packets every day are delivered through the Sabki rasoi.jpg

पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकदाऊनची घोषणा करण्यात आली. मात्र लॉकडाऊनमुळे रोजंदारीवर काम करणारे मजूर, स्थलांतरित कामगार, हॉस्टेलचे विद्यार्थी व बेघर अशा लोकांवर मोठा परिणाम झाला. याच पार्श्वभूमीवर त्यांना अन्नासारख्या जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी इंडियन पॉलिटिकल अकॅशन कमिटीच्या (आय-पीएसी) वतीने 'सबकी रासोई' या आगळ्या वेगळ्या उपक्रमाची सुरुवात केली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
या उपक्रमाचा अंतर्गत तातडीने जेवणाची गरज असलेल्या नागरिकांसाठी 'व्हर्च्युअल किचन'च्या माध्यमातून जेवण तयार करण्यात येत असून जेवणाचे पॅकेट गरजूंपर्यंत पोचविले जाते. सध्या हा उपक्रम देशातील सुमारे 20 शहरांमध्ये राबविण्यात येत असून दररोज दीड लाख हुन अधिक जेवणाचे पॅकेट गरजूंपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. यामध्ये पुणे, मुबंई, ठाणे सारख्या देशातील इतर शहरांचा समावेश आहे.

या उपक्रमात आय-पीएसी बरोबर इतर स्वयंसेविसंस्थांचा सुद्धा सहभाग असून विविध भागांमध्ये हे जेवणाचे पॅकेट संस्थेचे कार्यकर्ते तसेच स्वीगी, झोमॅटो व डन्झो तर्फे पोहोचविण्यात येत आहेत. दरम्यान हा उपक्रम फक्त लॉकडाऊन काळापर्यंत मर्यादित नसून पुढील काही दिवस चालेल. अशी माहिती आय-पीएसीच्या कार्यकर्त्यांनी दिली.

या उपक्रमाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी किंवा सहभागी होण्यासाठी, info.sabkirasoi@indianpac.com वर इमले पाठवू शकता किंवा 6900869008 या क्रमांकावर संपर्क करू शकता असे आवाहन आय-पीएसी तर्फे करण्यात आले आहे.

- सुमारे एक हजार प्रशिक्षित व इच्छूक स्वयंसेवकांचा सहभाग
- दहा दिवसांमध्ये सुमारे 15 लाख जेवणाचे पॅकेट गरजूंना देण्याचा उद्देश
- लॉकडाऊनच्या नियमांचे व मार्गदर्शक तत्वांचे पालन करून जेवण पोहोचविले जाते
- सोशल डिस्टनसिंगचे काटेकोरपणे पालन 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com