दीड कोटीच्या हिऱ्यांची चोरी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जुलै 2018

पुणे - रांका ज्वेलर्सच्या कामगारावर चाकूने वार करून तब्बल एक कोटी 48 लाख पाच हजार रुपयांचे हिरे व सोन्याचे दागिने असलेली बॅग चार जणांनी लुटून नेली. ही घटना पुणे रेल्वे स्थानक परिसरात गुरुवारी मध्यरात्री घडली. 

पुणे - रांका ज्वेलर्सच्या कामगारावर चाकूने वार करून तब्बल एक कोटी 48 लाख पाच हजार रुपयांचे हिरे व सोन्याचे दागिने असलेली बॅग चार जणांनी लुटून नेली. ही घटना पुणे रेल्वे स्थानक परिसरात गुरुवारी मध्यरात्री घडली. 

याप्रकरणी अजय मारुती होगाडे (वय 20, रा. सायन कोळीवाडा, मुंबई) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक एम. एम. मुजावर यांनी दिलेल्या माहितीनुसार, होगाडे हे रांका ज्वेलर्सच्या मुंबई येथील जव्हेरी बाजारातील शाखेमध्ये ऑफीस बॉय म्हणून कार्यरत आहेत. रांका ज्वेलर्सकडील सोन्याचे दागिने घडविण्यासाठी ते मुंबईहून पुण्याला येतात. गुरुवारी दुपारी अडीच वाजता ते रांका ज्वेलर्सच्या सुभाष बिष्णोई यांच्याशी फोनवर बोलून पुण्याला निघाले. होगाडे हे कर्वे रस्ता व रविवार पेठ शाखेतील दागिन्यांची बॅग घेऊन पुण्याला निघाले. रेल्वेने रात्री साडेबारा वाजता पुणे स्टेशन येथे पोचले. त्यानंतर फलाट क्रामंक सहावरून ते बाहेर आले. रिक्षा पकडण्यासाठी थांबले असताना पाठीमागून आलेल्या दोघांनी त्यांना धक्का मारून बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला; तर आणखी दोघांनी त्यांना मारहाण करण्याचा प्रकार केला. होगाडे यांनी विरोध केल्यानंतर त्यांच्यावर चाकून वार करून ते दुचाकीवरून पळाले. दरम्यान, या प्रकारानंतर होगाडे यांनी बिष्णोई यांना माहिती दिली. त्यांनी या प्रकाराबाबत बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. 

Web Title: One and a half million of diamond theft