esakal | नाना पेठेतील शितळादेवी मंदिरात चोरी करणारा जेरबंद

बोलून बातमी शोधा

नाना पेठेतील शितळादेवी मंदिरात चोरी करणारा जेरबंद

आरोपी हा सराईत गुन्हेगार असून, त्याने तडीपार आदेशाचे उल्लंघन करीत ही चोरी केली होती.

नाना पेठेतील शितळादेवी मंदिरात चोरी करणारा जेरबंद
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : नाना पेठेतील शितळादेवी मंदिरात चोरी करून पसार झालेल्या चोराला समर्थ पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून, त्याने तडीपार आदेशाचे उल्लंघन करीत ही चोरी केली होती.

विनायक बंडू कराळे (वय २२, रा. कासेवाडी, भवानी पेठ) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. नाना पेठेतील नवा वाडा परिसरातील एका इमारतीमध्ये श्री शितळादेवी मंदिर आहे. या मंदिराच्या दरवाजाचे कुलुप तोडून कराळेने काही दिवसांपूर्वी देवीचे सोन्या-चांदीचे मुकुट व अन्य दागीने चोरून नेले होते. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

हेही वाचा: पुण्यात पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे वाचले आठ जीव

दरम्यान, मंदिरात चोरी करणारा तरूण रास्ता पेठ भागात थांबल्याची माहिती गस्तीवर असलेल्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्यास सापळा लावून पकडले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला. त्याच्याविरुद्ध यापूर्वी चोरी, घरफोडी असे आठ गुन्हे दाखल झाले होते. कराळेला पोलिसांनी शहरातून तडीपार केले होते. त्याने तडीपार आदेशाचे उल्लंघन करीत ही चोरी केली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विशाल मोहिते, हवालदार संतोष काळे, सुशील लोणकर, सुभाष पिंगळे, शाम सूर्यवंशी, सचिन पवार, सुमीत खुट्टे, निलेश साबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.