पुण्यात पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे वाचले आठ जीव

कोथरूड पोलिसांनी अवघ्या 45 मिनिटांत युद्धपातळीवर केला ऑक्सिजन उपलब्ध.
police
policeSakal Media

पुणे : कोथरुडमधील एका रुग्णालयातून शनिवारी सकाळी 8.30 कोथरुड पोलिसांना फोन आला, "रुग्णालयातील ऑक्सिजन 30 ते 45 मिनिटे पुरेल, " हातात अवघा पाऊण तास, या वेळेत नातेवाईकांना समजवायचे की रुग्णाचे प्राण वाचवायचे ? कोथरुड पोलिसांनी दूसरा मार्ग निवडला.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पटापट फोन फिरवले, अनेकांना विनंती केली. काहींकडे ऑक्सीजन सिलेंडर असल्याचे समजले आणि पोलिसांच्या गाड्या तिकडे सुसाट निघाल्या, प्रत्येक सेकंदाचा विचार करत अवघ्या पाऊण तासात रुग्णालयास आवश्यक ऑक्सिजन मिळाला आणि सगळ्यांचाच जीव भांडयात पडला ! त्या रुग्णाचा काळ आला होता, पण पोलिसांच्या निधड्या छातीने तो काळ अक्षरश: माघारी परतवला. कर्तव्यदक्षपणा काय असतो हे तुम्हाला कोथरुड पोलिसांच्या या जिवंत उदाहरणाने दाखवून दिले, नव्हे अक्षरश: नतमस्तक करायला लावले. नेमके घडले काय ? तर शनिवारी सकाळी कोथरुड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मेघश्याम डांगे ड्यूटीवर नजर होते. त्याचवेळी त्यांना कृष्णा हॉस्पीटल रूग्णालयातुन एका डॉक्टरांचा फोन आला.

police
स्मार्ट चौकात वाहतूक बेटाऐवजी पिंप! 

"सर, आमच्या रुग्णालयातील ऑक्सिजन पाऊण तासात संपेल, 22 रुग्णाना दुसरीकडे हलवावे लागेल, त्यापैकी 7 ते 8 रुग्ण अत्यवस्थ आहेत. नातेवाईक गोंधळ घालु शकतात, आम्हाला मदत करा", परिस्थितीचे गांभिर्य ओळखून डांगे यांनी तत्काळ सर्व पोलिस, विशेष पोलिस अधिकारी (एसपीओ) अशा 50 ते 55 जणांना एकत्र बोलावले. त्यांना घटना समजून सांगितली.त्यानंतर डांगे यांनी आपला विचार बदलला, जर रुग्णालयास वेळेत ऑक्सीजन उपलब्ध करून दिला, तर पुढचा धोकादायक प्रसंग आणि मुख्य म्हणजे रुग्णाचा प्राण वाचेल, यादृष्टीने त्यांनी कामाला सुरुवात केली. अपर पोलिस आयुक्त डॉ.संजय शिंदे, पोलिस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनाही परिस्थितीबाबत कल्पना दिली. त्यापूर्वी डांगे यांनी आपल्या पोलिस ठाण्याच्या हद्दितील कोविड सेंटर व रुग्णालयांचा एक व्हाट्सअप गृप केलेला आहे. या ग्रूपवर संबंधित घटना सांगून ऑक्सिजनची गरज असल्यामुळे मदत मागितली. त्यांच्या या आवाहनाला काही रुग्णालयांनी तत्काळ प्रतिसाद दिला. "आमच्याकडे ऑक्सिजन सिलेंडर आहेत, घेऊन जा आणि परत करा" बस्स, या एका वाक्याने डांगे आणि त्यांच्या अवघ्या टिमला हुरूप आला.

इकडे एक- एक मिनीट कमी होत होता, तिकडे पोलिसांच्या गाड्याच्या चाकानी वेग पकडला. मिळेल तिथुन, जेवढे उपलब्ध होतील, तेवढे ऑक्सिजन सिलेंडर पोलिसांनी रुग्णालयास आणून दिले. त्याचवेळी शिवाजीनगर येथे ड्यूरा सिलेंडर असल्याची खबर संबंधित रुग्णालयाने पोलिसांना दिली. त्यानंतर खास पोलिस वाहन, क्रेन व अन्य वाहनास "एस्कॉर्ट" देऊन त्यांना शिवाजीनगरला पाठविले. तेथून काही मिनिटातच ड्यूरा सिलेंडर घेऊन वाहन संबंधित रुग्णालयात पोचले.प्रत्येक सेकंदा-सेकंदाचा विचार करत पोलिसांनी अवघ्या पाऊण तासात रुग्णालयास आवश्यक ऑक्सिजनचा साठा उपलब्ध करून दिला. त्यामुळे रुग्णालयानेही सूटकेचा नि:श्वास टाकला, तसेच रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांच्याही जिवात जीव आला. पोलिसांनी ड्यूटीच्या पलिकडे जाऊन घडविलेल्या या माणुसकीच्या दर्शनाने सगळेच आनंदित झाले.

आम्ही नातेवाईकांना समजाविण्यापेक्षा वाईट व अनुचित प्रकार घडूच नये, यासाठी प्रयत्न केले. ऑक्सिजन उपलब्ध केला नसता, तर 5 ते 6 जणाच्या जिवाला धोका होता. डॉक्टर, परिचारिका जीव धोक्यात घालून दिवस- रात्र रुग्णाला वाचविण्यासाठी धडपड असताना आपण का प्रयत्न करु नये, असे वाटले, त्यातून आम्ही हे काम केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या टिमने हि जबाबदारी पार पाडली.- मेघश्याम डांगे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोथरुड पोलिस ठाणे.

police
पुणे : पोलिसांच्या तत्परतेने वाचले २० रुग्णांचे प्राण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com