तब्बल एक कोटीचे सीमाशुल्क बुडविणाऱ्या उद्योजकास अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

पुणे - सौरऊर्जेच्या उपकरणात वापरण्यात येणाऱ्या अन आयात केलेल्या इव्हॅक्‍युएटेड ट्यूबचे सीमाशुल्क बुडवून खुल्या बाजारात विक्री करून एक कोटी सात लाख रुपयांचा सीमा शुल्क बुडविण्यात आला. याप्रकरणी सिद्धकला रिन्युएबल एनर्जी सिस्टिम्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक विशाल कुंभारधरे (वय ३८, रा. पुणे) यांना वस्तू व सेवाकर अर्थात जीएसटी इंटेलिजन्सच्या पुणे विभागाने सोमवारी रात्री अटक केली. 

द डायरेक्‍टर जनरल ऑफ जीएसटी इंटेलिजन्सच्या पुणे विभागाच्या उपसंचालक वैशाली पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई वरिष्ठ इंटेलिजन्स अधिकारी सुनील यादव आणि पांडुरंग देशमुख यांच्या पथकाने केली. त्यानंतर कुंभारधरे यांना मंगळवारी सकाळी पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले. मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांची रवानगी १३ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत केली आहे.

कुंभारधरे यांची सौरऊर्जेवरील पाणी तापविण्याचे यंत्र तयार करण्याची कंपनी आहे. केंद्र सरकारकडून सौरऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी उपकरणांमध्ये वापरण्यात येणारे इव्हॅक्‍युएटेड ट्यूबचे सीमा शुल्क भरण्यासाठी सवलतही दिलेली आहे; परंतु कुंभारदरे यांनी ती परदेशातून आयात करून त्याचे सीमाशुल्क न भरता उलट खुल्या बाजारात विक्री करून एक कोटी सात लाख रुपयांचा नफा कमविला; तसेच त्या व्यवहारांच्या नोंदी ठेवल्या नाहीत. सीमाशुल्क कायद्याचा भंग केल्याप्रकरणी; तसेच सरकारचा महसूल बुडविल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली.

Web Title: One arrested for one crore customs dumping entrepreneurs