पुणे : महिला डॉक्‍टरच्या घरी चोरी करणाऱ्या चालकास अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जानेवारी 2020

महिला डॉक्‍टरच्या घरुन सोन्याची बिस्कीटे व रोख रक्कम असा तब्बल सव्वा नऊ लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेणाऱ्या चोरट्यास अलंकार पोलिसांनी बेड्या ठोकल्या. महिला डॉक्‍टर व त्यांच्या कुटुंबाचा विश्‍वास संपादन करुन आरोपीने ही चोरी केल्याचे पोलिसांच्या चौकशीमध्ये माहिती पुढे आली आहे.

पुणे : महिला डॉक्‍टरच्या घरुन सोन्याची बिस्कीटे व रोख रक्कम असा तब्बल सव्वा नऊ लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेणाऱ्या चोरट्यास अलंकार पोलिसांनी बेड्या ठोकल्या. महिला डॉक्‍टर व त्यांच्या कुटुंबाचा विश्‍वास संपादन करुन आरोपीने ही चोरी केल्याचे पोलिसांच्या चौकशीमध्ये माहिती पुढे आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बापू रोहिदास कांबळे (वय 47, रा.शास्त्रीनगर, कोथरुड) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरुड येथील सिटी प्राईड चित्रपटगृहाजवळ राहणाऱ्या एका महिला डॉक्‍टरच्या घरातील 300 ग्रॅम सोने व पावणे दोन लाख रुपयांची रक्कम चोरीला गेल्याचा प्रकार काही दिवसांपुर्वी घडला होता. याप्रकरणी डॉक्‍टरने अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांकडून तपास सुरू होता. या चोरीच्या प्रकरणातील आरोपी यश हॉस्पिटल परिसरामध्ये येणार असल्याची खबर अलंकार पोलिस ठाण्याच्या तपास पथकातील पोलिस नाईक राजेंद्र लांडगे, किरण राऊत व योगेश बडगे यांना मिळाली. त्यानुसार, पोलिस उपनिरीक्षक सुरज गोरे, पोलिस कर्मचारी लांडगे, राऊत, बडगे, प्रफुल्ल चव्हाण, संदीप धनवटे यांच्या पथकाने संबंधीत ठिकाणी सापळा लावून आरोपीस ताब्यात घेतले.

भारतात कोरोना विषाणूचा पहिला बळी; केरळमध्ये आढळला रुग्ण

फिर्यादी यांच्या घरी चार ते पाच नोकर आहेत. तर कांबळे हा त्यांच्याकडे 6 ते 7 वर्षापासून चालक म्हणून काम करीत होता. त्यामुळे फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयाचा त्याच्यावर विश्‍वास होता. कुटुंबातील सदस्यांप्रमाणे त्याचा घरामध्ये वावर होता. त्याचवेळी त्याने फिर्यादी यांच्या घरातील साडे सात लाख रुपये किंमतीची व 300 ग्रॅम वजनाची तीन सोन्याची बिस्कीटे व पावणे दोन लाख रुपयांची अशी सव्वा नऊ लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता. पोलिसांनी या प्रकरणामध्ये घरातील नोकरांवर संशय व्यक्त केला होता. दरम्यान, त्यांच्याकडे तपास सुरू असतानाच कांबळे याने चोरी केल्याचे पोलिसांना कळले. त्यानुसार पोलिसांनी आरोपीस अटक केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one arrested for stealing gold and money at women doctors house in Pune