"वन डे फन डे'मध्ये बालकांसह पालकांची धम्माल! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

पुणे - दोन मिनिटांत चार हापूस आंबे खाणे, एअरोमॉडेलिंग, क्‍ले आर्ट आणि मॅजिक शोला बालकांसह पालकांचादेखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. "सकाळ'ने आयोजित केलेल्या "वन डे फन डे'मध्ये सोमवारी (ता.1) आनंदाची लयलूट झाली. 

पुणे - दोन मिनिटांत चार हापूस आंबे खाणे, एअरोमॉडेलिंग, क्‍ले आर्ट आणि मॅजिक शोला बालकांसह पालकांचादेखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. "सकाळ'ने आयोजित केलेल्या "वन डे फन डे'मध्ये सोमवारी (ता.1) आनंदाची लयलूट झाली. 

म्हात्रे पूल येथील कृष्णसुंदर लॉन्समध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. देसाई बंधू आंबेवाले, अमित गायकवाड ग्रुप हे "वन डे फन डे'चे सहप्रायोजक होते. उन्हाळ्याच्या सुटीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी "वन डे फन डे'मध्ये "आंबे खा स्पर्धा', विमानाची प्रतिकृती तयार करण्यासाठी "एअरो मॉडेलिंग वर्कशॉप', "क्‍ले आर्ट'च्या माध्यमातून मातीच्या विविध कलावस्तू तयार करणे, टेराकोटा वर्कशॉप, व्हर्च्युअल गेम झोन, जंपिंग राउंड, बंदुकीने फुगे फोडणे, थ्री डी शिवचरित्र, विविध शैक्षणिक व वैज्ञानिक साहित्य विक्री; तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. त्याला लहान बालकांसह पालकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दुपारी 2 वाजल्यापासून पालकांनी नोंदणीसाठी गर्दी केली होती. 

आंबा खाण्याच्या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला. विजेत्या स्पर्धकांना प्रथम क्रमांकासाठी दोन डझन हापूस आंबे, द्वितीय क्रमांकासाठी एक डझन; तर तृतीय क्रमांकासाठी अर्धा डझन आंबे "देसाई बंधू'चे मंदार देसाई, अमित गायकवाड यांच्या हस्ते देण्यात आले. 

"मॅजिक शो'ला प्रतिसाद 
"वन डे फन डे'मध्ये जादूगार जितेंद्र रघुवीर यांच्या "मॅजिक शो'ला उपस्थित बालक आणि पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या वेळी झोपलेली मुलगी हवेत उडविणे, रिकाम्या सिलिंडरमधून विविध वस्तू काढणे, मान कापणे, पत्त्यांची जादू, मॅजिक दोरी, पुस्तकामध्ये पाणी टाकणे, बंद पेटीत वस्तू लपविणे, अशा विविध जादूच्या प्रयोगांना उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला. 

Web Title: one day fun day spontaneous response