संविधान जाळल्याच्या निषेधार्थ भिगवण येथे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण

प्रशांत चवरे
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

भिगवण : दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर संविधानाची प्रत जाळल्याच्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ येथील अमर बौध्द संघटनेच्या वतीने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. सोमवारी (ता.13) सकाळी दहा वाजता भिम स्तंभांस अभिवादन करुन उपोषणास सुरुवात करण्यात आली.

अमर बौध्द संघटनेचे अमोल कांबळे, आर.पी.आय.चे जिल्हा कार्याध्यक्ष विक्रम शेलार, बाळासाहेब शेलार, रंगनाथ शेलार, अजिनाथ जगताप, दिपक दणाणे, संघर्ष धेंडे, अजय शेलार, मंगेश शेलार आदीसह अमर बौध्द संघनटनेचे कार्यकर्ते उपोषणास बसले होते. संविधान जाळणाऱ्या व्यक्कींविरुध्द कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निळकंठ राठोड व महसुल विभागाचे प्रतिनिधी यांना देण्यात आले. कोळी महासंघ, मराठा महासंघ, हिंदु खाटीक संघटना, आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळ आदी संघटनानी उपोषणास पाठिंबा दिला. 

Web Title: one day hunger strike in bhigwan