आरोग्य विषयक समस्यांबाबत एकदिवसीय उपोषण

रमेश मोरे
गुरुवार, 19 एप्रिल 2018

जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवी येथील मुळा पवना नद्यातील वाढलेली जलपर्णी त्यात सोडलेले कारखान्यांचे दुषित पाणी, सोबत औंध भागाकडुन नदीत येणारे सांडपाणी यामुळे सांगवीकर नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गोष्टींकडे पालिका प्रशासन व मा.जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी सांगवी नागरीक कृती समितीच्या वतीने बुधवारी (ता.१८) येथील अहिल्यादेवी होळकर चौकात एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. याचबरोबर पवना नदीपात्रावरील दशक्रिया विधीघाटाची उंची वाढवून सुशोभिकरण करावे.

घाट परिसरात राजरोसपणे चालणारे अवैध धंदे बंद करावेत. शेजारीच आरोग्य विभागाकडुन सांगवी परिसरातील कचरा डंपींग केला जातो. पावसाळ्यात कच-यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते.या बाजुलाच वेताळ महाराज उद्यान आहे.कच-याच्या दुर्गंधीमुळे लहान मुले,अबाल वृद्धांना याचा त्रास सहन करावा लागतो. याची जागा बदलुन योग्य ती विल्हेवाट लावावी अशा मागण्या उपोषण कर्त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केल्या आहेत.यात कृती समितीच्या अध्यक्षा उज्वला ढोरे सह सुवर्णा सरोदे,कोमल कवडे, मोनिका ढोरे,नं दा चव्हाण, सुनिता पाटिल, मनोहर पवार, बबन ढोरे, जानराव यावले, रावसाहेब ढमाले, लक्ष्मण निवंगुणे, लक्ष्मण ठाकर, दशरथ ढोरे, प्रकाश कानडे उपोषणास बसले होते.

Web Title: one day hunger strike for health issues in sangavi pune