पिंपरी: मोटार दुभाजकाला धडकून एक ठार; एक जखमी

संदीप घिसे 
रविवार, 13 मे 2018

पिंपरी : भरधाव वेगातील मोटार रस्ता दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना पिंपरी येथे रविवारी (१३) पहाटे घडली.

शिवम प्रकाश जाधव (वय २० रा. खराळवाडी पिंपरी) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तर त्याचा आतेभाऊ ऋषिकेश विलास पवार (वय २०) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर चिंचवड स्टेशन येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवम हा मोटार घेऊन चिंचवड स्टेशनकडून वल्लभनगरच्या दिशेने भरधाव वेगात जात होता. मोरवाडी येथील ग्रेड सेपरेटर रोडवर त्याचा मोटारीवरील ताबा सुटला आणि तो रस्ता दुभाजकाला जाऊन धडकला. या अपघातात शिवम यांचा जागीच मृत्यू झाला तर ऋषिकेश याच्यावर उपचार सुरू आहेत.

Web Title: one dead in accident pimpri