पुणे : न्यू कोपरे येथील आगीत एकाचा जळून मृत्यू

शनिवारी रात्री रसायनाच्या गोडाऊन वजा दुकानाला लागलेल्या आगीत दोन जण जखमी झाले होते त्यातील एका युवकाचा जळून मृत्यू झाला आहे.
Fire
FireSakal

वारजे माळवाडी - शिवणे- उत्तमनगर येथील न्यू कोपरे गावात शनिवारी रात्री रसायनाच्या गोडाऊन (Chemical Godown) वजा दुकानाला लागलेल्या आगीत (Fire) दोन जण जखमी (Injured) झाले होते. त्यातील एका युवकाचा जळून मृत्यू (Death) झाला आहे. तसेच, दोन बस जळाल्या असून, कार गॅरेज चालकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ब्रिजेश केशवनारायण सहानी (वय २१, रा.गल्ली नंबर ३, तपोधाम, वारजे) याचा मृत्यू झाला आहे. तर संजय रामप्रीत सहानी (वय ३७, रा.गल्ली नंबर ३, तपोधाम, वारजे) हे जखमी झाले आहेत. हे दोघे मावस भाऊ होते. संजय हे व्यवसाय मालक होते. संजय यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशी माहिती उत्तमनगर पोलिस ठाण्याच्या निरीक्षक वैशाली चांदगुडे यांनी दिली.

Fire
तलवारीने केक कापणाऱ्या आणखी एकास गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून अटक

पोलिसांच्या माहितीनुसार, न्यूकोपरे गावात राजू गायकवाड यांच्या जागेत संजय सहानी यांनी गोडाऊन वजा दुकान भाड्याने घेतले होते. या ठिकाणी रंगासाठी वापरले जाणारे थीनर हे रसायन ठेवले होते. त्याच्या डाव्या बाजूला एक कार गॅरेज होतं. तर उजव्या बाजूला रिकाम्या जागेत गायकवाड यांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या ट्रॅव्हलच्या बसेस उभ्या होत्या. शनिवारी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास रसायनाचे गोडाऊन मध्ये आग लागली. थिनर ड्रम जवळच शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. त्यामुळे आग मोठ्या प्रमाणात भडकली. वेल्डिंगसाठी लागणारी दोन सिलेंडर येथे होते. त्याचा स्फोट झाल्यामुळे रिकाम्या जागेत उभे असलेल्या राजू गायकवाड यांच्या दोन बसला आग लागली. त्या बसने देखील पेट घेतला. त्या बस काही वेळात जळून खाक झाल्या. त्याच्या पुढील बाजूस आणखी चार- पाच बस उभ्या होत्या.

शिवाजी मित्र मंडळाचे कार्यकर्ते मदतीला धावून आले. त्यांनी या परिसरातील नागरिक, सिलेंडर देखील काढले. त्यांन सुरक्षित ठिकाणी ठेवले. पोलिस नागरिकांनी अग्निशामक दलाला माहिती दिली. महापालिका कोथरूड, सिंहगड व पुणे महानगर प्रदेश प्राधिकरण यांच्या अग्निशामक दलाने येऊन आगीवर नियंत्रण मिळविले. रसायन असल्यामुळे जे आग आटोक्यात आणण्यास रात्री दोन वाजले होते.

Fire
पुणे सोमवारपासून अनलॉक; महापौरांची माहिती

या गोडाऊनच्या शेजारी कारच्या गॅरेजमध्ये काम सुरू होतं. गॅरेज चालक महेश देवळे यांनी व त्यांच्या सहकार्यांनी तातडीने चार वाहने बाहेर काढली. रसायनामुळे आग मोठी भडकली. या आगीचे लोट आणि धूर अंतरावरून दिसत होते. राजू गायकवाड यांनी यांची दोन बस जळाल्या. त्यापैकी जळालेली एक गाडी फेब्रुवारी २०२० मध्ये घेतली होती. दोन- तीन ट्रिपा केल्यानंतर कोरोनामुळे टाळेबंदी झाली. तेव्हापासून त्यांची गाडी वापरात नव्हती. तसेच या परिसरात त्यांच्या सहकाऱ्यांचे असलेल्या गाड्या देखील कोरोनामुळे पर्यटन, लग्नसराई बंद असल्यामुळे त्यांचा हा ट्रॅव्हल्सचा विषय व्यवसाय बंद होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com