दोन मोटारसायकलच्या अपघातात एकाचा मृत्यू, एक जखमी

बिल्ला बाँग इंटरनॅशनल हायस्कूल समोरील माळवाडी-हडपसर रस्त्यावर दोन मोटारसायकलची धडक बसून अपघात झाला.
accident
accident Sakal

उंड्री - बिल्ला बाँग इंटरनॅशनल हायस्कूल समोरील माळवाडी-हडपसर रस्त्यावर दोन मोटारसायकलची धडक बसून अपघात झाला. या अपघातात एकाच मृत्यू झाला, तर एकजण जखमी झाला आहे.

अभिजित चंद्रकांत शिंदे (रा. शेवाळेवाडी-मांजरी, ता. हवेली, जि. पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सुरेश टकले (वय २१, रा. कामठेवस्ती, माळवाडी-हडपसर, पुणे) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सांगितले की, मृत्युमुखी पडलेल्या अभिजित शिंदे यांच्या भरधाव वेगातील मोटारसायकलची धडक फिर्यादी सुरेश टकले यांच्या मोटारसायकलला बसून अपघात झाला. या अपघातात दोघांच्या मोटारसायकलचे नुकसान झाले, फिर्यादी जखमी झाला, तर मयत आरोपी गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. पुढील तपास हडपसर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ पडसळकर करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com