पुणे : भरधाव छोट्या टेम्पोची दुभाजकाला धडक; एकाचा मृत्यू

Road accident.jpg
Road accident.jpg

पुणे : पीएमपीएलची बंद बस दुरूस्तीसाठी जाणाऱ्या छोट्या टेम्पो चालकाने भरधाव टेम्पो चालविल्यानंतर त्याचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो दुभाजकाला धडकला. या अपघातामध्ये टेम्पोमध्ये बसलेल्या एकास गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. ही घटना 30 ऑक्‍टोबरला रात्री आठ वाजता भेकराईनगर येथील आयबीएम चौकात घडली. 

आयुब आवद शेख (वय 44, रा. सय्यदनगर, हडपसर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सुंदर हिरवे (वय 45, रा. फुरसुंगी गाव) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन चालक पंकज राठोड (रा. हडपसर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुंदर हिरवे व आयुब शेख हे दोघेजण पीएमपीएल बसच्या दुरूस्तीचे काम करतात. नेहमीप्रमाणे 30 ऑक्‍टोबरला दोघेजण पीएमपीएल बसच्या सेवेत असलेल्या महालक्ष्मी ट्रान्सपोर्टच्या छोट्या टेम्पोतून जात होते. टेम्पोचालक भरधाव टेम्पो चालवित होता. भेकराईनगर येथील आयबीएम चौकात टेम्पो वळविताना नियंत्रण सुटल्याने टेम्पो दुभाजकाला जाऊन धडकला. त्यामध्ये टेम्पोत बसलेले आयुब शेख हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना बुधवारी त्यांचा मृत्यू झाला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com