पुलावरुन दुचाकी कोरडया ओढयात पडून एकाचा मृत्‍यु

पुणे कोलाड रस्‍त्‍यावर मुळशी तालुक्‍यातील चाचीवली व ताम्हिणी गावच्‍या शिवेवरील वाघुरणेच्‍या ओढयावरील पुलावरुन कोरडया ओढयात दुचाकी पडून अनोळखी व्‍यक्‍तीचा मृत्‍यु झाला.
death
deathsakal
Summary

पुणे कोलाड रस्‍त्‍यावर मुळशी तालुक्‍यातील चाचीवली व ताम्हिणी गावच्‍या शिवेवरील वाघुरणेच्‍या ओढयावरील पुलावरुन कोरडया ओढयात दुचाकी पडून अनोळखी व्‍यक्‍तीचा मृत्‍यु झाला.

माले - पुणे कोलाड रस्‍त्‍यावर मुळशी तालुक्‍यातील चाचीवली व ताम्हिणी गावच्‍या शिवेवरील वाघुरणेच्‍या ओढयावरील पुलावरुन कोरडया ओढयात दुचाकी पडून अनोळखी व्‍यक्‍तीचा मृत्‍यु झाला. तर सोबतच्‍या एकाला मोठी दुखापत झाली आहे. मंगळवार (ता. १७) रोजी संध्‍याकाळी सहा वाजण्‍याच्‍या सुमारास हा अपघात घडला.

ताम्हिणी व चाचीवली गावच्‍या शिवेवर असणा-या वाघुरणेच्‍या ओढयावरील पुलावरुन जाणा-या काही प्रवाशांना अपघात सदृश्‍य परिस्थिती दिसल्‍याने त्‍यांनी ओढयात डोकाऊन पाहिले. तेंव्‍हा ओढयात दुचाकीसह दोन तरुण अपघातग्रस्‍त अवस्‍थेत पडलेले आढळले. त्‍यातील एक युवक जास्‍त मार लागल्‍याने जागीच मृत्‍युमुखी पडला होता. तर दुस-याच्‍या पायाला मार लागल्‍याने त्‍याला चालता येत नव्‍हते. प्रवाशांनी त्‍यांच्‍या नातेवाईकांना फोनवरुन माहिती दिली.

आंदेशे (ता.मुळशी) परिसरातील आदिवासी समाजातील हे युवक असण्‍याचा अंदाज ग्रामस्‍थांनी व्‍यक्‍त केला. आज संध्‍याकाळी उशिरापर्यंत पोलिसांत या घटनेची नोंद झाली नव्‍हती. त्‍यामुळे मयत व जखमींची नावे समजु शकली नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com