इंद्रायणी नदीपात्रात कार पडल्याने एकाचा मृत्यू; एक बेपत्ता

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

मावळचे तहसीलदार रणजित देसाई, पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर, उपनिरीक्षक नितीन नम यांनी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

टाकवे बुद्रुक : पुलावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात तीन विद्यार्थी बुडाले. टाकवे बुद्रुक येथील इंद्रायणी नदीवरील ब्रिटिशकालीन पूल येथे गुरुवारी (ता.1) ही घटना घडली. यापैकी एक जण बाहेर आला असून दुसऱ्या विद्यार्थ्याचा मृतदेह रात्री उशिरा सापडला. तर बेपत्ता असलेल्या अजून एकाचा शोध अद्याप सुरू आहे. 

संकेत नंदकुमार अस्वले (वय 20) याचा मृतदेह गुरूवारी रात्री सापडला. त्याच्यावर आज (शुक्रवारी) सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. अक्षय मनोहर जगताप (वय 20) या बेपत्ता विद्यार्थ्यांचा शोध एनडीआरएफ व लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र रेस्क्यू पथक घेत आहे. पुलापासून दोन किलोमीटर नदीपात्रात शोध मोहीम सुरू असून अद्याप शोधकार्यात यश आलेले नाही.

मावळचे तहसीलदार रणजित देसाई, पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर, उपनिरीक्षक नितीन नम यांनी घटनास्थळी दाखल झाले आहेत. एनडीआरएफ सहाय्यक निरीक्षक संतोष वारंगुले यांचे पथक शोधकार्यात सहभागी झाले असून विजय राव, ज्ञानेश्वर निचित, वैभव शेढागळे, बीपलप दास हे डीप ड्रायव्हिंग सेटच्या मदतीने पाण्यात जाऊन शोध घेत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One dies as car falls in Indrayani river One missing