आळंदीत कोरोनाबाधितांनी गाठला सव्वाशेच्या पुढचा टप्पा; एकूण रूग्ण संख्या पोहचली...

One hundred and thirty two patients of Corona in Alandi area
One hundred and thirty two patients of Corona in Alandi area

आळंदी : आळंदीत कोरोनाच्या रूग्णांनी आता सव्वाशेच्या पुढचा टप्पा गाठला असून एकूण रूग्णांची संख्या एकशे बत्तीस झाले. कोरोनाच्या रूग्णांची वाढ होत असताना केवळ कर्मचाऱ्यांची उपलब्धता न झाल्याने आळंदीत सुरू होणाऱ्या कोव्हिड सेंटरची घोषणा हवेतच राहिल्याने आळंदीकरांना अद्याप उपचारासाठी म्हाळूंगे येथील कोव्हिड सेंटरला जावे लागत आहे. आळंदीत तीन जणांचा मृत्यू झाला तरी प्रशासनाने अधिक गांभीर्य दाखविण्याची गरज असल्याचे चित्र आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

आळंदीत पुणे, पिंपरी-चिंचवडमधून लग्नासाठी वऱ्हाडी आणि अस्थी विसर्जनासाठी अनेकजण येत आहेत. भक्त पुंडलिक मंदिराजवळ इंद्रायणी नदीत अस्थी विसर्जनासाठी सकाळपासूनच गर्दी असते. पुणे पिंपरी भागातून लोक येत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक होण्याचा संभव आहे. त्यातच आळंदीजवळील चाकण आणि मरकळ औद्योगिक भागात जाणारे कामगारांची संख्या लक्षणीय आहे. भोसरी एमआयडीसीत आळंदीतून ये-जा करणारेही अधिक आहेत. शिवाय पदपथावर भरणारा भाजी बाजार यावर पालिका प्रशासनाचे अद्याप नियंत्रण नाही. आळंदीत इंद्रायणी तिरावर अनेकजण बेवारसपणे फिरत असतात. या लोकांची तपासणी नाही आणि त्यांना बाहेर फिरण्यास मनाईही नाही. त्यातच शहरात डेंगी चिकूनगुणियाच्या रूग्णांबरोबरच दिवसेंदिवस कोरोनाचेही रूग्ण वाढत आहे. आजपर्यंत एकशे बत्तीस रूग्ण झाले. यापैकी तीन जण मृत झाले. तरीही पालिकेकडून स्वच्छतेबाबत प्रभावीपणे औषध फवारणी केली जात नाही. ज्या ठिकाणी रूग्ण आढळला त्या ठिकाणी केवळ पत्रा मारून कर्मचारी निघून जातात. परिणामी गेल्या काही दिवसांत रोज पाच ते दहा रूग्णांची वाढ होत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

केवळ आळंदीच नाही तर आळंदी परिसरातील केळगाव, वडगाव घेनंद, कोयाळी, मरकळ, सोळू, चऱ्होली खुर्द गावांमधेही आता कोरोनाच्या रूग्णांत वाढ होताना दिसत आहे. तरीही आळंदी आणि परिसरात कोरोनाला रोखण्यासाठी प्रभावी कामगिरी केली जात नसल्याचे चित्र आहे. आळंदीत देहूफाटा येथे एमआयटी महाविद्यालयात एकशे ऐंशी रूग्णांची सोय होईल अशी व्यवस्था असणारे कोव्हिड सेंटर तयार केले. यासाठी तहसिलदार सुचित्रा आमले, मुख्याधिकारी अंकूश जाधव यांनी पाहणी केली. मात्र, यासाठी आवश्यक कर्मचारी अद्याप उपलब्ध न झाल्याने गेली काही दिवस कोविड सेंटर सुरू होण्याच्या प्रतिक्षेत आहे. आळंदी आणि परिसरातील लोकांना महाळूंगे येथे जाण्यासाठी दूरचे अंतर आहे. आळंदीत ही सोय लवकर सुरू झाली तर थोडाफार फरक पडू शकेल.

याबाबत मुख्याधिकारी अंकूश जाधव यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, ''देहूफाटा येते कोव्हिड सेंटरमध्ये बेडची उपल्धता केली. मात्र, आवश्यक कर्मचारी अद्याप मिळाले नाही. आमचा पाठपुरावा सुरू आहे. लवकरच कोविड सेंटर सुरू होण्याची अपेक्षा आहे.''

डिप्लोमाच्या प्रवेशाला मुहूर्त सापडेना; वेळापत्रकाकडे लागले विद्यार्थ्यांचे लक्ष!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com