लॉकडाऊन 4 : पुणे शहरात गेल्या दोन दिवसात शंभर दस्तांची नोंदणी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

गेल्या दिवसात पुणे शहरात सुरू झालेल्या दस्त नोंदणीतून राज्य सरकारला जवळपास तीन कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. या दोन दिवसात जवळपास सदनिकांच्या खरेदी-विक्रीचे सुमारे शंभर दस्तांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्रालाही हळूहळू चालना मिळू लागली आहे.

पुणे - गेल्या दिवसात पुणे शहरात सुरू झालेल्या दस्त नोंदणीतून राज्य सरकारला जवळपास तीन कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. या दोन दिवसात जवळपास सदनिकांच्या खरेदी-विक्रीचे सुमारे शंभर दस्तांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्रालाही हळूहळू चालना मिळू लागली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

रेडझोन वगळता अन्य भागातील दस्तनोंदणी कार्यालय सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. त्यानुसार पुणे शहरातील 22 दस्तनोंदणी कार्यालयांपैकी 17 दस्त नोंदणी कार्यालय दोन दिवसांपासून सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात मुद्रांक शुल्क विभागाने केवळ दोन्ही जमीन आणि सदनिकांच्या व्यवहार नोंदणी क रून घेण्यास सुरवात केली आहे. दस्त नोंदणी कार्यालय सुरू झाल्याच्या पहिल्या दिवशी शहरात सुमारे 54 दस्तांची नोंदणी झाली. त्यातून राज्य सरकारला एक कोटी 94 लाख रुपयांचा महसूल मिळाला. तर बुधवारी दिवसभरात 45 दस्तांची नोंदणी होऊन त्यातून 1 कोटी रुपयांचे महसूल मिळाला. येत्या दोन ते तीन दिवसात भाडेकरारासह अन्य प्रकाराच्या दस्तांची नोंदणी देखील सुरू करण्यात येणार असल्याचे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून सांगण्यात आले.

पुणे : लॉकडाउनचे नियम शिथिल झाले अन् कोरोनाने दिवसभरात घेतले आतापर्यंतचे सर्वाधिक बळी!

गेल्या काही दिवस मंदी आणि त्यानंतर लॉकडाऊनमुळे बांधकाम क्षेत्रात मरगळ आली होती. परंतु गेल्या दोन दिवसांपासून ती हळूहळू दूर होऊ लागली असल्याचे दस्तनोंदणीवरून समोर आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One hundred cases registered in Pune city in last two days