वरवंडमध्ये आणखी एकास कोरोनाची बाधा

अमर परदेशी, वरवंड
मंगळवार, 30 जून 2020

गावापासून काही अंतरावरच एका वस्तीवर इमारतीमध्ये फर्निचरचे काम सुरू आहे. यामध्ये काम करणाऱ्या एका कारागिराला दोन दिवसांपासून ताप, सर्दी, खोकला याचा त्रास जाणवत होता. संशयित लक्षणे वाटू लागल्याने आरोग्य विभागाच्यावतीने त्याला रविवारी (ता.28) कोरोनाच्या तपासणीसाठी यवत येथे पाठविले. मंगळवारी (ता.30) त्यास कोरोनाची बाधा झाल्याचे वैदयकीय अहवालात निष्पन्न झाले.

वरवंड : ''दौंड तालुक्यातील वरवंड येथे एकास कोरोनाची बाधा झाल्याचे वैद्यकीय अहवालात निष्पन्न झाले आहे,'' अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी दिली. दरम्यान गावात एका आठवड्यात कोरोना बाधित रुग्णाचा आकडा दोन झाल्याने खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

गावापासून काही अंतरावरच एका वस्तीवर इमारतीमध्ये फर्निचरचे काम सुरू आहे. यामध्ये काम करणाऱ्या एका कारागिराला दोन दिवसांपासून ताप, सर्दी, खोकला याचा त्रास जाणवत होता. संशयित लक्षणे वाटू लागल्याने आरोग्य विभागाच्यावतीने त्याला रविवारी (ता.28) कोरोनाच्या तपासणीसाठी यवत येथे पाठविले. मंगळवारी (ता.30) त्यास कोरोनाची बाधा झाल्याचे वैदयकीय अहवालात निष्पन्न झाले.

पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती आणि नियोजनबद्ध धावपळ; वाचा तुम्हाला माहिती नसलेल्या सुप्रिया सुळे

दरम्यान, रुग्णाला उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले.तर रुग्णाच्या संपर्कात आलेल्या एकूण 14 जणांना तपासणीसाठी यवत येथे पाठविण्यात आले आहे.अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी. डॉ.तुकाराम बनसोडे यांनी 
तत्पूर्वी,  मागील आठवड्यात आढळून आलेल्या रुग्णाच्या कुटुंबातील व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला होता मात्र, गावात कोरोनाचा दुसरा रुग्ण सापडल्याने वरवंडकरांची डोकेदुखी वाढली आहे.

HappyBirthday:म्हणून, सुप्रिया सुळे बनल्या संसदरत्न

संबधित कारागीर हा अंदाजे 10 दिवसापूर्वी फर्निचरचे साहित्य खरेदीसाठी पुण्याला गेला होता. त्यावेळीच त्याला ही बाधा झाली असावी असा अंदाज आरोग्य विभागाने वर्तविला आहे. दरम्यान नागरिकांनी सुरक्षतेच्या दृष्टीकोनातून काळजी घ्यावी. कामाशिवाय कोणी बाहेर पडू नका. मास्कचा वापर करा,असे आवाहन डॉ.बनसोडे यांनी केले. 
 
पुणे : लग्न समारंभांना होतीये गर्दी; शासनाच्या निर्णयाला केराची टोपली...

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One infected with found coronavirus in Varvand