निरगुडसर : निरगुडसर - मेंगडेवाडी (ता.आंबेगाव) रस्त्यावरील देशमुख वस्ती जवळ दोन दुचाकीची वेगात धडक होऊन यामध्ये रामदास पिराजी शिंदे (वय 62) यांचा जागीच मृत्यू झाला असून राजेंद्र संभाजी बोराटे हे गंभीर जखमी झाले आहेत,त्यांच्यावर पुढील उपचार मंचर येथील खाजगी रुग्णालयात सुरू आहे,ही घटना शुक्रवार (ता. 21)रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
आंबेगाव येथील रामदास पिराजी शिंदे हे आपल्या दुचाकीला पेट्रोल भरून मेंगडेवाडी वरून जवळे आपल्या घरी जात होते तर जवळे येथीलच राजेंद्र संभाजी बोराटे हे पण दुचाकीस पेट्रोल भरण्यासाठी मेंगडेवाडी च्या दिशेने शुक्रवारी नऊ वाजण्याच्या सुमारास जात होते,यावेळी मेंगडेवाडी- निरगुडसर रस्त्यावर देशमुख वस्ती नजीक या दोन्ही दुचाकीची समोरासमोर धडक होऊन मोठा अपघात झाला,
हा अपघात भीषण असल्याने रामदास पिराजी शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला तर राजेंद्र संभाजी बोराटे हे गंभीर जखमी झाले त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी मंचर खाजगी करण्यात दाखल करण्यात आले. मयत झालेले रामदास शिंदे यांच्या मागे दोन मुले एक मुलगी,सून, नातवंडे असा परिवार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.