पाच वाहनांचा विचित्र अपघात ; एक जागीच ठार

हरिभाऊ दिघे
गुरुवार, 24 मे 2018

तळेगाव दिघे : संगमनेरमार्गे जाणाऱ्या पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चंदनापुरी घाटात पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात एकजण जागीच ठार झाला, तर तिघेजण किरकोळ जखमी झाले. गुरुवारी पहाटे अडीचच्या सुमारास ही घटना घडली. 

तळेगाव दिघे : संगमनेरमार्गे जाणाऱ्या पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चंदनापुरी घाटात पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात एकजण जागीच ठार झाला, तर तिघेजण किरकोळ जखमी झाले. गुरुवारी पहाटे अडीचच्या सुमारास ही घटना घडली. 

पुणे येथून आंबे घेवून मालवाहू टेंपो चालक हा नाशिकच्या दिशेने चालला होता. दरम्यान गुरुवारी पहाटे अडीचच्या सुमारास चंदनापुरी घाटात चालकाचा ताबा सुटून टेंपो महामार्गाच्या मध्यभागी उलटला. त्यामुळे टेंपोतील सर्व आंबे महामार्गावर पडले. त्यानंतर महामार्गावर पडलेले आंबे भरण्यासाठी दुसरा टेंपो ( क्र. एमपी ०९ जीजी ८९१३ ) बोलविण्यात आला. त्याचवेळी संगमनेरच्या दिशेने जाणारा मालवाहू कंटेनर ( क्र. एनएल ०१ के २३३४ ) व तिसरा टेंपो ( क्र. एमएच १२ एफसी ८०२० ) ही वाहने समोरील वाहनावर धडकली.

कंटेनर समोरील दुभाजकाच्या मध्यभागी जावून अडकला. दरम्यान आनंदवाडी येथील अमोल जिजाबा सरोदे यांच्या दुचाकीचाही ( क्र. एमएच १७ बीएच ८४६४ ) अपघात होत चक्काचूर झाला. झालेल्या अपघातात कैलास अशोक पाटील ( वय ३५ रा. शहापूर ता. अमळनेर जि. जळगाव ) हे जागीच ठार झाले. अमोल सरोदे, उमेशकुमार व अजयसिंग रमेशसिंग हे तिघे किरकोळ जखमी झाले. या विचित्र अपघातामुळे वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी येत क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला हलविली व वाहतूक सुरळीत केली. अपघातात एकाच्या मृत्यू प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

  • आंबे नेण्यासाठी गर्दी 

ऐन धोंड्याच्या महिन्यात आंबे घेवून चालेला टेंपो उलटल्याचे समजतात अनेकांनी घटनास्थळी धाव घेत आंबे वाहून नेले. फुकटच्या आंब्यांची लयलूट करण्यासाठी मोठी गर्दी उसळ

Web Title: one killed on spots of five vehicle strange accident

फोटो गॅलरी