पुणे जिल्ह्यात एक लाख ९६ हजार जणांनी बदलली नावे

आशा साळवी
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

धर्म, जन्मतारखेत बदल
नावाप्रमाणे आता धर्मात आणि जन्मतारखेतही बदल करण्यात येत आहेत. देशात लोकशाही असल्याने अनेकजण आवडत्या धर्माचा स्वीकार करू शकतात. त्यामुळेच दोन वर्षांत १५४ जणांनी धर्म बदलला आहे. १४३३ जणांनी जन्मतारखेत बदल केला आहे.

पिंपरी - ‘वॉट्‌स देअर इन नेम... म्हणजेच नावात काय ठेवलंय? असा प्रश्‍न विल्यम शेक्‍सपियरला सोळाव्या शतकात पडला होता. पण आता नावातच सर्वकाही आहे, असे म्हणण्याची स्थिती आहे. म्हणूनच गेल्या दोन वर्षभरात पुणे जिल्ह्यात तब्बल एक लाख ९६ हजार जणांनी नावे, आडनावे अधिकृतरीत्या बदलली आहेत. त्यातून सरकारला लाखो रुपयांचा महसूल मिळाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बदलत्या काळात नावात बदल करण्याची मानसिकता वाढली आहे. त्यामुळे सरकारने यासाठी शासकीय फोटोझिंको मुद्रणालय व ग्रंथागार कार्यालये सुरू केली आहेत. २०१५ पासून नाव बदलण्याचे कामकाज www.dgps.maharashtra.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन केले जाते. जिल्ह्यात २०१७-१८ मध्ये ५२ हजार १४३ जणांनी, तर २०१८-१९ मध्ये ५७ हजार ४०२ जणांनी नाव आणि आडनावात बदल केले आहेत. पूर्वी नोकरदार महिला लग्नानंतर सासरचे नाव लावण्यासाठी नावात बदल करत होत्या. आता ज्योतिषी, व अंकशास्त्रानुसार नाव बदलण्याच्या सल्ल्यामुळे नाव, आडनाव बदलणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

शरद पवारांच्या हत्येचा कट? पोलिसांत तक्रार, 'सरकार उलथवून टाकण्याचे कारस्थान'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One lakh 96 thousand people changed names in Pune district