मेट्रोच्या ठेकेदाराला एक लाखाचा दंड  

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असताना कर्वे रस्त्यावर खांबावरील लोखंडी रॉड पडून मोटारीचे नुकसान झाले. याप्रकरणी महामेट्रोने संबंधित ठेकेदाराला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

पुणे - मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असताना कर्वे रस्त्यावर खांबावरील लोखंडी रॉड पडून मोटारीचे नुकसान झाले. याप्रकरणी महामेट्रोने संबंधित ठेकेदाराला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे; तसेच संबंधित मोटारीच्या चालकाला नुकसानभरपाई देण्याचा आदेश ठेकेदाराला दिला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गरवारे महाविद्यालयाच्या अलीकडे सात जानेवारी रोजी खांबावरील एक लोखंडी रॉड कोसळला. त्या वेळी तेथून जाणाऱ्या मोटारीवर तो पडला. मोटारीत सुदैवाने मागील बाजूस कोणीही बसले नव्हते. त्यामुळे जीवितहानी झाली नाही; परंतु मोटारीचे नुकसान झाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One lakh fine to the metro contractor

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: