ऑनलाईन पध्दतीने एक लाख रुपयांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

फिर्यादी हे पुणे ते चेंबुर असा बसने प्रवास करत होते. यावेळी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या बँक खात्यातून मोबीक्वीक अॅप्लिकेशनचा वापर करुन ऑनलाईन पध्दतीने एका लाख रुपये काढून घेतले. 

पुणे : ऑनलाईन पध्दतीने एकाची एक लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 39 वर्षीय व्यक्तीने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

फिर्यादी हे पुणे ते चेंबुर असा बसने प्रवास करत होते. यावेळी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या बँक खात्यातून मोबीक्वीक अॅप्लिकेशनचा वापर करुन ऑनलाईन पध्दतीने एका लाख रुपये काढून घेतले. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक डी. के. मांडगे करत आहेत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One lakh rupees fraud by online method in pune