पुणे : भरधाव डंपरने चिरडल्याने दुचाकीस्वार ठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

मुंबई-पुणे महामार्गावर भरधाव डंपरने दुचाकीस्वाराला चिरडल्याने त्याचा मृत्यू झाला. हा अपघात तळेगाव दाभाडे हद्दीतील लिंब फाटा येथे सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास झाला.

तळेगाव स्टेशन (पुणे) : मुंबई-पुणे महामार्गावर भरधाव डंपरने दुचाकीस्वाराला चिरडल्याने त्याचा मृत्यू झाला. हा अपघात तळेगाव दाभाडे हद्दीतील लिंब फाटा येथे सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास झाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या भीषण अपघातात भरधाव डंपर उलटुन दुचाकीवर पडल्याने प्रसाद शिवाजी बारगळ (२३,समर्थनगर, वांबोरी ता. राहुरी जि. नगर) याचा मृत्यू झाला. प्रसाद हा तळेगावजवळील आंबी येथील डी. वाय. पाटील स्कुल ऑफ इंजिनिअरींग अभियांत्रिकी महाविद्यालयात तृतीय वर्षात शिकत होता. अपघातात चालकही जखमी झाला आहे.

अंडरवेअरमध्ये मोबाईल लपवून परिक्षेत करायचा कॉपी; मग...

एमआयडीसीकडून सोमाटणे दिशेला चाललेला डंपर क्रमांक एमएच १४ जीयु ८९०२ ने प्रसाद याच्या दुचाकीला धडक देऊन दुचाकीवर पलटला. दुचाकी आणि प्रसाद डंपरखाली सापडल्यामुळे चिरडून अक्षरशः चेंदामेंदा झाला. अपघातामुळे पुणे-मुंबई महामार्गावर दोन तासापेक्षा अधिक काळ कोंडी झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक सतीश पवार आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचत क्रेनच्या सहाय्याने डंपर उचलून मृतदेह बाहेर काढला. वाहतुक सुरळीत होण्यास रात्रीचे नऊ वाजले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one man died in Dumper accident in talegoan station Pune