म्हाडाच्या सोडतीसाठी अर्ज करण्यास एक महिना मुदतवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

म्हाडा

म्हाडाच्या सोडतीसाठी अर्ज करण्यास एक महिना मुदतवाढ

पुणे : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून (म्हाडा) पुणे, पिंपरी-चिंचवडसह सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील २ हजार ९०८ घरांसाठी काढण्यात येणाऱ्या ऑनलाइन सोडतीसाठी अर्ज करण्यास एक महिना मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार आता १३ मेऐवजी १३ जूनपर्यंत नागरिकांना अर्ज करता येणार आहेत.

हेही वाचा: मायबाप, आम्हालाबी द्या की लस!

म्हाडाच्या योजनेतील २ हजार १५३ सदनिका आणि २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत ७५५ घरांसाठी अर्ज करण्यास १३ मे रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुदत देण्यात आली होती. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाइन अर्ज करण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती म्हाडाच्या पुणे विभागाचे मुख्य अधिकारी नितीन माने पाटील यांनी दिली. इच्छुकांना https://lottery.mhada.gov.in तसेच www.mhadamaharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे.

हेही वाचा: मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर मराठी अभिनेत्याला लुटले

पुण्यातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Web Title: One Month Extension To Apply For Mhada

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune News
go to top