ओव्हर टेक करण्याच्या नादात जीपने दुचाकीला उडवले; दुचाकीस्वार जागीच ठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जून 2020

पिरंगुट (ता. मुळशी) येथील जीप व मोटर सायकलच्या अपघातात एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला. अपघातानंतर जीप चालक पळून गेला.  

पिरंगुट  : पिरंगुट (ता. मुळशी) येथील जीप व मोटर सायकलच्या  अपघातात एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला. रोहित सतीश चोरगे  (वय २५ , रा.  शिळीम,  ता. मावळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. येथील पुणे- कोलाड या घाट रस्त्यावर अग्रो गॅस पंपासमोर हा अपघात झाला. अपघातानंतर जीप चालक पळून गेला.        

पुण्यातील `या` भागात अवैध व्यावसायिक जोमात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास महिंद्रा जीप  (एम एच १२ आर आर १८०० ) चारचाकी गाडी पुण्याच्या दिशेने चालली होती. पिरंगुट येथील लवळे फाटा व वनालिका गृहनिर्माण संस्थेच्या दरम्यान पुणे- कोलाड रस्त्यावर अग्रो गॅस पंपासमोर असलेल्या रस्त्यावरून मृत रोहित चोरघे हा तरुण दुचाकीने पौडच्या दिशेने जात होता. चारचाकीच्या चालकाने पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना ओव्हर टेक करून जीप पुढे नेत असताना समोरून यामाहा या दुचाकीवरून (एमएच १२ एन के ८२९ ) येत असलेल्या रोहित चोरघेच्या गाडीला जोरदार धडक दिली. त्यामुळे रोहित गंभीर जखमी झाला होता.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा 

रोहितला स्थानिकांनी व पोलिसांनी एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. परंतु, तेथील डॉक्टरांनी रोहितला मृत घोषित केले. दरम्यान जीप चालक फरार झाला. मूत रोहीतचा मृतदेह पौड येथील शासकीय दवाखान्यात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पुढील तपास उपनिरीक्षक अनिल लवटे करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one person killed in Pirangut accident