कॉसमॉस बॅंकप्रकरणी मुंबईतून एकाला अटक

कॉसमॉस बॅंकप्रकरणी मुंबईतून एकाला अटक

पुणे - ऑगस्ट महिन्यात कॉसमॉस बॅंकेवर झालेल्या सायबर हल्ल्याद्वारे कोट्यवधी रुपये काढण्याच्या प्रकरणात पुणे पोलिसांच्या सायबर शाखेने आणखी एका आरोपीस अटक केली. आरोपीने मुंबई येथील पाच एटीएम केंद्रांतून साडेतीन लाख रुपयांची रक्कम काढली होती. आत्तापर्यंत अटक केलेल्या आरोपींमध्ये मुंबईतील आरोपींची संख्या सर्वाधिक आहे. 

मोहनलाल ताराजी राठोड (सध्या रा. विश्रांतवाडी, मूळ रा. पाली, राजस्थान) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात कॉसमॉस बॅंकेवर सायबर हल्ला झाला होता. या हल्ल्यामध्ये सायबर गुन्हेगारांनी तब्बल ९४ कोटी रुपये लंपास केले होते. दरम्यान, आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त ज्योतिप्रिया सिंह यांच्या मार्गदर्शनाखाल पोलिस निरीक्षक जयमार पायगुडे यांच्या पथकाने सायबर गुन्हे शाखेच्या पथकाकडून सहा महिन्यांपासून कसून तपास करत आतापर्यंत दहा आरोपींना अटक केली आहे.

दरम्यान, पायगुडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता राठोड यास मुंबईमध्ये अटक करण्यात आली. राठोड याने सायबर हल्ला झाला त्या वेळी मुंबईतील ४ ते ५ एटीएम केंद्रांमधून साडेतीन लाख रुपयांची रक्कम काढली होती. राठोड याच्यासमवेत आणखी तिघेजण होते. पोलिसांनी त्याच्याकडून मोबाईल व डेबीट कार्ड जप्त केले आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत आठ ते नऊ जणांना पोलिसांनी यापूर्वी अटक केली आहे.

मेडिकलमध्ये काम
राठोडचे बी. फार्मचे शिक्षण झाले असून, तो एक वर्षापासून पुण्यातील विश्रांतवाडी येथील एका मेडिकलमध्ये कामाला होता. यापूर्वी तो मुंबईमध्ये पाच-सहा वर्षे एका मेडिकलमध्ये काम करत होता. राठोड याने आणखी किती ठिकाणी पैसे काढले, त्याचे साथीदार कोण आहेत, त्यांना बनावट कार्ड कोणी दिले, याबाबतची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पायगुडे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com