Katraj Milk : कात्रजकडून दूध उत्पादकांना एक रुपया बोनस

पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या ६४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उत्पादकांना एक रुपया फरक देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला.
pune district milk producer sangh meeting
pune district milk producer sangh meetingsakal

कात्रज - पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या ६४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उत्पादकांना एक रुपया फरक देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. संघाला या आर्थिक वर्षात ५१ लाख निव्वळ नफा झालेला असून दूध उत्पादकांनी संघास पुरवठा केलेल्या दूधास प्रतिलिटर एक रुपया दर फरक देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

मागील वर्षी दूध दर फरकापोटी ८ कोटी ६३ लाख रुपये देण्यात आलेले होते. यंदा दूध दर फरकापोटी ६ कोटी ७३ लाख रुपये देण्यात येणार आहेत.

सभेच्या सुरुवातीस व्यवस्थापकीय संचालकांनी स्वागत केल्यानंतर विविध क्षेत्रातील दिवंगत मान्यवरांच्या स्मृतीस अभिवादन व कृत्तज्ञता व्यक्त करुन त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. संघाचे अध्यक्ष व सभाअध्यक्ष भगवान पासलकर यांनी संघाच्या प्रगतीचा आढावा दिला.

यानंतर दूध उत्पादकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना अध्यक्ष व संचालक मंंडळाने उत्तरे दिली. आजच्या वार्षिक सर्व साधारण सभेमध्ये उत्कृष्टपणे कामकाज करणाऱ्या १६ आदर्श दूध संस्था आणि पशुखाद्याची सर्वात जास्त विक्री करणार्या ३ दूध संस्थांची निवड करून त्यांचा प्रशस्तिपत्रक, सन्मान चिन्ह व ११ हजार रुपये देऊन सन्मान करण्यात आला.

सभेस आजी माजी संचालक, दूध उत्पादक संस्थांचे प्रतिनिधी व शेतकरी उपस्थित होते. संघाचे उपाध्यक्ष भाऊ देवाडे यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया

संघ सातत्याने दूध उत्पादकांच्या हिताचा निर्णय घेत असून उत्पादकांना जास्तीत जास्त दूध खरेदी दर देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिला आहे. काही अडचणी असल्या तरी त्या सोडविण्यात येतील. यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांनीही संघास सहकार्य करावे.

- भगवान पासलकर, अध्यक्ष, कात्रज डेअरी

सन्मानित करण्यात आलेल्या आदर्श दूध संस्था

१) काठापूर बु. सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित, काठापूर बु, ता. आंबेगाव

२) श्री. भिमाशंकर महिला सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित, चांभारेवस्ती (सुपे), ता. खेड

३) श्री. हनुमान सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित, होगजेवाडी (औदर), ता. खेड

४) श्री. मल्लिकार्जुन सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित, न्हावरा, ता. शिरुर

५) श्री. नागेश्वर सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित, निमोणे, ता. शिरुर

६) फराटे पाटील सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित, मांडवगण फराटा, ता. शिरुर

७) जयमल्हार महिला सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित, नंदादेवी (नांगरेवाडी), ता. दौंड

८) यशवंत सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित, जाधववाडी, ता. जुन्नर

९) श्री. आदिशक्ती सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित, तांबे, ता. जुन्नर

१०) विठ्ठल रुक्मिणी सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित, वरसगांव, ता. वेल्हा

११) हेमलाता महिला सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित, मांजरी बु., ता. हवेली

१२) कानिफनाथ सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित, दिसली, ता. मुळशी

१३) बलराम सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित, आणे, ता. जुन्नर

१४) अंदरमावळ विभाग सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित, वहानगांव, ता. मावळ

१५) काळदरी सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित, काळदरी, ता. पुरंदर, जि. पुणे

१६) श्री. दत्तकृपा सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित, दामगुडेवाडी, ता. भोर, जि. पुणे

सन्मानित करण्यात आलेल्या पशुखाद्य संस्था

१) लक्ष्मीमाता वाळकी सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित, वाळकी, ता. दौंड

२) वाकेश्वर पेठ सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित, पेठ, ता. आंबेगाव

३) अंबिका सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित, भांबर्डे, ता. शिरुर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com