बाणेरमध्ये सापडला कोरोना रुग्ण; 'ती' सोसायटीच केली सील

शीतल बर्गे
गुरुवार, 21 मे 2020

लॉक डाऊन तिसर्‍या आणि चौथ्या टप्प्यात शिथिलता येऊनही नागरिक उस्फूर्तपणे काळजी घेत होते,  रस्त्यांवर  गर्दी न करता सोशल डिस्टंसिग  ठेवून खरेदी करणे, अनावश्यक कामे वगळता केवळ अत्यावश्यक सेवा घेण्यासाठी ही मंडळी घराबाहेर येत होती. व्यापारी ही आपल्याकडील कामगारांसह ग्राहकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत राहिले. त्यामुळे बाणेरमध्ये फारसा चिंतेचे कारण दिसत नाही. परंतु येथील एका मोठ्या सोसायटीत 36 वर्षाच्या महिलेला कोरोनाची लागण झाली आणि त्याची माहिती पसरताच अवघे बाणेर चिंतेत आले.

बालेवाडी : बाधित क्षेत्राबाहेरील (कंटेन्मेंट झोन) एरियात कोरोना रुग्ण सापडताच तो परिसर 'सील' करण्याचे महापालिकेचे नियोजन  24 तासांपूर्वी झाले; तेच बाणेरमधील एका सोसायटीत कोरोना शिरला आणि रुग्ण सापडला. त्याचक्षणी सोसायटीचे प्रवेशमार्ग रोखले गेले आणि हा भाग आता बाधित क्षेत्र असल्याचे सांगण्यात आले. कोरोनाच्या संसर्गात दोन महिने शांत राहिलेल्या बाणेरमध्ये बुधवारी सायंकाळी मात्र भीती दाटून आली. येथील रुग्णाला ताब्यात घेतले असुन गंभीर बाब म्हणजे  संबंधित महिला रुग्ण(वय 36) गर्भवती असल्याची माहिती समोर आली आहे.  महिलेवर उपचार सुरू करण्यात आले असून, तिच्या  कुटुंबातील अन्य सदस्यांचीही तपासणी करण्यात येत आहे, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
लॉकडाऊनच्या तिसर्‍या आणि चौथ्या टप्प्यात शिथिलता येऊनही नागरिक उस्फूर्तपणे काळजी घेत होते. रस्त्यांवर  गर्दी न करता सोशल डिस्टंसिग ठेवून खरेदी करणे, अनावश्यक कामे वगळता केवळ अत्यावश्यक सेवा घेण्यासाठी ही मंडळी घराबाहेर येत होती. व्यापारी ही आपल्याकडील कामगारांसह ग्राहकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत राहिले. त्यामुळे बाणेरमध्ये फारसा चिंतेचे कारण दिसत नाही. परंतु येथील एका मोठ्या सोसायटीत 36 वर्षाच्या महिलेला कोरोनाची लागण झाली आणि त्याची माहिती पसरताच अवघे बाणेर चिंतेत आले.

कोरोनाचा संसर्ग हा निवासी संकुलात झपाट्याने होत असल्याने महापालिकेच्या आरोग्य खात्याने ही तातडीने कार्यवाही करीत रुग्णांवर उपचार केले. त्यांच्या कुटुंबियांना तपासणीसाठी बोपोडी येथील सह्याद्री हॉस्पिटलला नेण्यात आले असून त्यांच्या तपासणीचा अहवाल येईपर्यंत कुटुंबीयांना राहत्या घरातच क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे. तसेच महिला रुग्ण गर्भवती असल्यामुळे तिला उपचारासाठी भवानी पेठ येथील सोनवणे हॉस्पिटल नेण्यात आले असून पुढील उपचार सुरू आहेत. 

- विद्यार्थ्यांनो, परीक्षा रद्द केल्यास 'कोरोना बॅच'चा शिक्का मारला जाणार

त्यापलिकडे जात या सोसायटीतील लोक कोणत्याही कारणास्तव घराबाहेर ये-जा करणार नाही,  त्यासाठीचा बंदोबस्तही केला आहे. बॅरिकेट उभारून सोसायटीचा मार्ग बंद केला आहे. तर रहिवाशांना घरपोच सुविधा देण्यावरही भर देण्यात आला आहे. 
तसेच  सोसायटीमध्ये औषध फवारणी केली असून नागरिकांनी घाबरून न जाता लॉकडाउनच्याच्या नियमांचे पूर्वीप्रमाणेच काटेकोर काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.            
   
- विद्यार्थ्यांनो, परीक्षा रद्द केल्यास 'कोरोना बॅच'चा शिक्का मारला जाणार
 
''बाधित क्षेत्राबाहेर रुग्ण आढळून आल्यास तातडीने तो भाग सील करून तिथे संसर्ग वाढणार नाही याची काळजी घेतली जात आहे त्यातून बाणेर मध्ये ज्या ठिकाणी रुग्ण सापडला तिथे त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी करून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे''
- डॉ. रामचंद्र हंकारे, मनपा आरोग्य प्रमुख

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One Society Sealed after Corona patient found in Baner