‘दोन विद्यार्थी एक टॅब’ अशी रचना करून ऑनलाइन शिक्षण सुरू; कोठे ते पहा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 14 August 2020

शिकायचे आणि मोठे व्हायचे, हा ध्यास उराशी बाळगलेली चौथीतील दीक्षा रोज चार ते पाच किलोमीटरचे अंतर तुडवीत नियमित शाळेत यायची; परंतु कोरोनामुळे शाळा बंद झाल्या. त्यानंतर ऑनलाइन शिक्षण सुरू झाले; परंतु घरची परिस्थिती बेताची असल्याने दीक्षाला ऑनलाइन शिक्षण घेणे अशक्‍य होते. दरम्यान, शाळेने एका संस्थेच्या मदतीने निधी जमा केला आणि दीक्षासारख्या अन्य विद्यार्थ्यांना टॅब्लेटच्या साह्याने घरातूनच शिक्षण घेता यावे, यासाठी ‘होम स्कूलिंग’ उपक्रम सुरू केला.

पुणे - शिकायचे आणि मोठे व्हायचे, हा ध्यास उराशी बाळगलेली चौथीतील दीक्षा रोज चार ते पाच किलोमीटरचे अंतर तुडवीत नियमित शाळेत यायची; परंतु कोरोनामुळे शाळा बंद झाल्या. त्यानंतर ऑनलाइन शिक्षण सुरू झाले; परंतु घरची परिस्थिती बेताची असल्याने दीक्षाला ऑनलाइन शिक्षण घेणे अशक्‍य होते. दरम्यान, शाळेने एका संस्थेच्या मदतीने निधी जमा केला आणि दीक्षासारख्या अन्य विद्यार्थ्यांना टॅब्लेटच्या साह्याने घरातूनच शिक्षण घेता यावे, यासाठी ‘होम स्कूलिंग’ उपक्रम सुरू केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गोऱ्हे बुद्रूक या गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत जवळपास दीडशे विद्यार्थी आहेत. त्यातील जवळपास पन्नास विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन शिक्षणाचे साधन नाही. याच शाळेतील दीक्षा जगताप हिचे उदाहरण घ्यायचे झाले, तर तिचे वडील रोजंदारीवर, तर आई घरकाम करते. त्यांच्याकडे साधा मोबाईल आहे. अशीच परिस्थिती अन्य विद्यार्थ्यांची आहे. मग या विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाइन शिक्षण कसे पोचवायचे, या विचारातून शाळेने थिंकशार्प फाउंडेशनच्या मदतीने ‘क्‍लाऊड फंडिंग’द्वारे साडेपाच लाख रुपयांचा निधी जमा केला. त्यातून ५० टॅब खरेदी केले. सध्या ‘दोन विद्यार्थी एक टॅब’ अशी रचना करून ऑनलाइन शिक्षण सुरू आहे, असे शाळेचे सहाय्यक शिक्षक रजनीकांत मेंढे यांनी सांगितले.

तरुण-तरुणींनो, मोबाईलमध्ये ऍप डाऊनलोड करताय? तर 'जोकर'पासून राहा सावध

टॅबवर शिकायला मजा येत आहे. शाळा बंद असली, तरी शिकता येत असल्याने छान आहे. टॅबद्वारे शिक्षक समोर दिसत असून, ऑनलाइन वर्गात मैत्रिणीही भेटतात. शाळेने दिलेला घरचा अभ्यास पूर्ण झाला, की त्याचा फोटो काढून आम्ही सरांना व्हॉट्‌सॲपद्वारे पाठवितो. 
- दीक्षा जगताप, विद्यार्थिनी, इयत्ता चौथी

ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना पीएमपीचा ठेंगा; वाचा काय आहे हे प्रकरण

प्रकल्पाचे फायदे

  • घरात बसून शिक्षण घेता येते. विद्यार्थी-शिक्षक जोडले जातात
  • मल्टीमीडियाच्या स्वरूपात विद्यार्थी अभ्यासाचा आनंद घेतात
  • विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान आणि गॅजेटचा वापर सवयीचा होतोय

रात्रभर पाऊस; खडकवासला धरणाचे एक फुटाने उघडले सहा दरवाजे

असा आहे प्रकल्प
गोऱ्हे बुद्रूक येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत थिंकशार्प फाउंडेशनच्या मदतीने चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘होम स्कूलिंग’ प्रकल्प राबविण्यात येत आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना टॅब्लेट दिला आहे. यामध्ये अभ्यासाव्यतिरिक्त पंधराशे पुस्तके आणि अन्य शैक्षणिक ॲप आहेत. पालघर येथील डहाणू जिल्हा परिषद शाळेत हा प्रकल्प राबविला जात असल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष फड यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one tab use in Two students start online learning