पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी : रुग्णांची संख्या घटली; कोरोनाला रोखण्यात मिळतंय यश

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 4 August 2020

शहर आणि जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्याही कालच्या तुलनेत कमी झाली आहे.

पुणे : पुणेकरांसाठी कोरोनाबाबत दिलासा देणारी घटना सोमवारी (ता.३) घडली आहे. शहर आणि जिल्ह्यातील नव्या रुग्णांच्या संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. सोमवारी दिवसभरात जिल्ह्यातील नव्या रुग्णांचा आकडा दोन तर पुणे शहरातील रुग्णांचा आकडा एक हजाराच्या आत आला आहे.

पुणे जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात एक हजार ९९८, तर शहरात केवळ ७८१ रुग्ण आढळून आले आहेत. रविवारच्या रुग्ण संख्येच्या तुलनेत सोमवारी जिल्ह्यात तब्बल एक हजार १९ तर पुणे शहरात ९८१ रुग्ण कमी झाले आहेत.

Breaking : हॉटेल, लॉज, मॉल्सबाबत महापालिकेने घेतला महत्त्वाचा निर्णय; वाचा सविस्तर बातमी​

सोमवारी पुणे शहरात ७८१, पिंपरी-चिंचवडमध्ये ७४८, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात २७४, नगरपालिका क्षेत्रात ४४ आणि कॅंंटोन्मेंट बोर्डात १५१ नवे रुग्ण सापडले आहेत.

दरम्यान, दिवसभरात ४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे आतापर्यंत मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या आता दोन हजार १२९ झाली आहे. रविवारी (ता. २) रात्री ९ वाजल्यापासून सोमवारी (ता. १३) रात्री नऊ वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे.

आतापर्यंत झालेल्या एकूण मृत्यूंमध्ये पुणे शहरातील १ हजार ४१४, पिंपरी-चिंचवड शहरातील ४०४, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १६५, नगरपालिका क्षेत्रातील ७० आणि कॅंंटोन्मेंट बोर्डातील ७६ रुग्ण आहेत. दिवसभरात  मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक २१ जण आहेत. याशिवाय सोमवारी पिंपरी चिंचवडमधील १७,  जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ४ आणि नगरपालिका व कॅंंटोन्मेंट बोर्डातील मिळून ३ जणांचा समावेश आहे.

- जम्मू-काश्मीरवरून आलेल्या 'त्या' पार्सलने उडाला पोलिसांचा गोंधळ!​

उपचार घेणारे रुग्णही कमी झाले!

दरम्यान, शहर आणि जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्याही कालच्या तुलनेत कमी झाली आहे. रविवारी २८ हजार २२३ रुग्णांवर उपचार करण्यात येत होते. सोमवारी ही संख्या २६ हजार ७९१ पर्यत खाली आली आहे. रविवारच्या तुलनेत सोमवारी उपचार घेणारे १ हजार ४३१ रुग्ण कमी झाले आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One thousand 998 new cases of corona were found in Pune on Monday 3rd August