पुणे रिंगरोडच्या भूसंपादनासाठी एक हजार कोटी; अजित पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ring-Road
पुणे रिंगरोडच्या भूसंपादनासाठी एक हजार कोटी; अजित पवार

पुणे रिंगरोडच्या भूसंपादनासाठी एक हजार कोटी; अजित पवार

पुणे - रिंगरोडच्या (Ringroad) भूसंपादनासाठी (land acquisition) राज्य सरकारकडून (State Government) पुरवणी अंदाजपत्रकात एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. येत्या मार्चपर्यंत ही तरतूद खर्ची करा, अशा शब्दात पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) (MSRDC) आदेश दिले आहेत. त्यामुळे रिंगरोडसाठीच्या भूसंपादनाच्या कामास लवकर सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या रिंगरोडचे काम एमएसआरडीसीने हाती घेतले आहे. या रिंगरोडचे पूर्व व पश्‍चिम असे दोन टप्पे आहेत. पूर्व रिंगरोड उर्से (ता. मावळ)- केळवडे (ता. भोर) असा आहे. पूर्व रिंगरोड हा मावळ, खेड, हवेली, पुरंदर आणि भोर या तालुक्‍यातून जाणार आहे. तर पश्‍चिम रिंगरोडला केळवडेपासून सुरुवात होणार असून हवेली, मुळशी आणि मावळ येथील उर्से टोलनाका येथे एकत्र येणार आहे.

हेही वाचा: धक्कादायक।धायरी येथे डंपरने लोखंडी दुभाजक तोडून हातगाड्या व टपऱ्या मध्ये शिरला ; पाहा व्हिडीओ

भूसंपादनासाठी रिंगरोडच्या पश्‍चिम भागातील मार्गिकिच्या मोजणीचे कामाला २१ एप्रिल २०२१ रोजी सुरूवात करण्यात आली. एकूण ३७ गावांमधून हा रिंगरोड जाणार आहे. त्यापैकी ३५ गावातील मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. रिंगरोडसाठी ६९५ हेक्टर जमिनींचे संपादन करण्यात येणार आहे. आतापर्यंत ३५ गावातील ६३० हेक्टरहून अधिक जमिनींच्या मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित १ गावांच्या मोजणीचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे या महिना अखेरपर्यंत पश्‍चिम भागातील रिंगरोडच्या मोजणीचे काम जवळपास शंभर टक्के पूर्ण होणार आहे.

दरम्यान, या रिंगरोडसाठी भूसंपादन सुरू करण्याबाबतचे आदेश आठ दिवसांपूर्वीच सार्वजनिक बांधकाम खात्याचे सचिव सदाशिव साळुखे यांनी काढले होते. त्या आदेशानुसार कोणत्या गावातील किती क्षेत्र या रिंगरोडमध्ये जाणार आहे, यांची माहिती देखील देण्यात आली आहे. पवार यांच्या उपस्थितीत सोमवारी मुंबई येथे प्रकल्प अंमलबजावणी समितीची बैठक झाली. या बैठकीत एमएसआरडीसी रिंगरोडच्या कामकाजाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी पवार यांनी डिसेंबर महिन्यात झालेल्या अधिवेशनात रिंगरोडच्या भूसंपादनासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून ती तरतूद ३१ मार्च अखेर खर्ची टाकण्याचे आदेश एमएसआरडीसी आणि जिल्हाधिकारी यांना दिले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे लवकरच रिंगरोडच्या भूसंपदनाचे काम सुरू होणार आहे.

हेही वाचा: पुणे शहर व जिल्ह्यात मंगळवारी ६ हजार ११० नवे कोरोना रुग्ण

या गावांतून जाणार रिंगरोड...

भोर तालुका : केळवडे, कांजळे, खोपी, कुसगाव आणि रांजे

हवेली तालुका : रहाटावडे, कल्याण, घेरासिंहगड, खासगाव मावळ, वरदाडे, मालखेड, सांडवी ब्रुद्रुक, सांगरूण, बहुली.

मुळशी तालुका : कातवडी, मारणेवाडी, आंबेगाव, उरावडे, कासार आंबोली, भरे, आंबडवेट, घोटावडे, रिहे, केससेवाडी, पिंपलोळी.

मावळ तालुका : पाचणे, चांदखेड, बेंबडओहोळे, धामणे, परंदवाडी उर्से

दृष्टिक्षेपात प्रकल्प...

  • पश्‍चिम भागातील चार तालुक्यांतील ३७ गावांतून जाणार

  • ६९५ हेक्टर जमिनीचे भूसंपादन

  • मोजणीच्या कामाला २१ जुलै रोजी सुरुवात

  • ३७ पैकी ३६ गावांतील मोजणी पूर्ण, केळवडे या गावांची मोजणी लवकरच पूर्ण होणार

  • स्वच्छेने जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना पाचपट मोबदला

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top