Pune : विमाननगरमध्ये एकेरी वाहतुकीचा प्रस्ताव,सूचना व हरकती मागवल्या,व्यापाऱ्यांचा विरोध

मात्र या प्रस्तावाला काही नागरिकांनी व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे
Vadgaon Sherry
Vadgaon Sherrysakal

वडगाव शेरी : रोजची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी विमाननगर येथील दोन मुख्य रस्त्यावर एकेरी वाहतुकीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांनी नागरिकांकडून याबाबत हरकती व सूचना मागवल्या आहेत. मात्र या प्रस्तावाला काही नागरिकांनी व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे.वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी याबाबत प्रसिद्धी पत्र काढले आहे. गणपती मंदिर चौकाकडुन दोराबजी मॉल चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी करण्यात येणार असुन दोराबजी मॉल ते गणपती मंदीर अशी एकेरी वाहतुक व्यवस्था करण्यात येणार आहे.

तसेच सीसीडी चौकाकडुन श्रीकृष्ण हॉटेल चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी करण्यात येत असुन श्रीकृष्ण हॉटेल चौक ते सीसीडी चौक अशी एकेरी वाहतुक व्यवस्था असेल. प्रस्तावित एकेरी वाहतुकीविषयी सुचना असल्यास त्या वाहतूक शाखेकडे १७ नोव्हेंबर पर्यंत कळवायच्या आहेत. नागरीकांच्या सूचना व हरकतीचा विचार करुन एकेरी वाहतुकीचा अंतिम आदेश काढण्यात येणार आहेत.

काही वर्षांपूर्वी विमाननगरमध्ये एकेरी वाहतूक करण्यात आली होती. परंतु नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध केल्यामुळे तो प्रस्ताव त्यावेळी गुंडाळण्यात आला होता. आता पुन्हा एकेरी वाहतुकीचा प्रस्ताव आल्यामुळे नागरिक आणि व्यापारी काय भूमिका घेतात यावर पुढील निर्णय होईल. याविषयी विमानतळ वाहतूक पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे म्हणाले, नजीकच्या काळात विमाननगर मध्ये आयटी कंपन्या सुरू होणार आहेत त्यामुळे येथील वाहतुकीचा ताण आणखी वाढेल. झेब्रा क्रॉसिंग पट्टे, सिग्नल, वाहतूक चिन्ह, रस्त्याच्या बाजूचे आणि दुकानांसमोरचे अतिक्रमण याबाबत महापालिका प्रशासनाशी समन्वय साधून उपाययोजना करू. तसेच नागरिक व व्यापाऱ्यांची बाजू ऐकून घेऊन पुढील निर्णय होईल.

विमाननगर येथील बँक, शाळा, आईस्क्रीम ट्रक, रहिवासी जागेतील व्यवसाय, अनेक आयटी कंपन्याच्या गाड्या रस्त्यावर लागतात. यमुळे कोंडी होते. केवळ काही राजकीय लोकांची मर्जी राखण्यासाठी एकेरी वाहतूक लादली जात आहे. आमच्या व्यवसायावर परिणाम होणार असल्याने एकेरी वाहतुकीला आमचा विरोध आहे. - सोहनसिंग सोना (व्यावसायिक ,विमाननगर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com