चाकणला कांदा 50 रुपये किलो 

हरिदास कड
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

खेड तालुक्यातील चाकण येथील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले बाजार आवारात कांद्याची सुमारे पाचशे क्विंटल आवक आज झाली. कांद्याला घाऊक बाजारात किलोला पन्नास रुपये भाव मिळाला. किरकोळ बाजारात कांदा एका किलोला सत्तर रुपये राहिला. 

चाकण (पुणे) : येथील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले बाजार आवारात कांद्याची सुमारे पाचशे क्विंटल आवक आज झाली. कांद्याला घाऊक बाजारात किलोला पन्नास रुपये भाव मिळाला. किरकोळ बाजारात कांदा एका किलोला सत्तर रुपये राहिला. 

वखारीत साठविलेला जुना गरवी जातीचा कांदा सध्या बाजारात विक्रीसाठी येत आहे. पावसाने कांदा मोठ्या प्रमाणात सडला आहे. त्यामुळे आवक अत्यल्प होत आहे. नवीन कांद्याच्या लागवडी पावसाने खोळंबल्या आहेत. तसेच पावसाने कांद्याच्या रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे लागवडीला उशीर झाला आहे. त्यातून यंदाचा कांदा हंगाम दोन महिने उशिरा जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात सुरू होणार आहे. अवकाळी पावसाने कांद्याचे भाव अजून वाढण्याची दाट शक्‍यता आहे.

खेड तालुक्‍यात कांदा पिकाच्या लागवडीला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. बहुतांश कांदा वखारीत सडल्याने आवक घटली आहे. त्यामुळे भाव वाढत आहेत, अशी माहिती माहिती खेड बाजार समितीचे सभापती बाळशेठ ठाकूर, माजी सभापती चंद्रकांत इंगवले, सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी दिली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion in the Chakan market is 50 rupees kg