Alephata News : कांदा उत्पादक शेतक-यांनी कांदा लिलाव पाडला बंद

आळेफाटा या ठिकाणी कांद्याचे दर कोसळल्याने कांदा उत्पादक शेतक-यांनी काही काळ कांदा लिलाव बंद पाडला होता.
Alephata onion auction close
Alephata onion auction closesakal

- राजेश कणसे

आळेफाटा - आळेफाटा या ठिकाणी कांद्याचे दर कोसळल्याने कांदा उत्पादक शेतक-यांनी काही काळ कांदा लिलाव बंद पाडला होता. केंद्र सरकारने अचानक पणे कांद्याची निर्यात बंद केल्याने कांद्याचे बाजारभाव उतरल्याने जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा येथील उपबाजारात शेतक-यांनी कांदा लिलाव बंद पाडले होते.

सरकारने कांदा दर नियंत्रणासाठी निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यामुळे दोन दिवसांपुर्वी चाळीस ते पन्नास रुपये विकला जाणारा कांदा एकदम २० ते २५ रुपयावर आल्याने शेतकरी संतप्त झाल्याने उपस्थित कांदा उत्पादक शेतक-यांनी एकत्र येवून बाजार समितीत सुरु असलेले कांदा लिलाव बंद पाडले.

यामुळे काही काळ बाजार समिती परीसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रसंगी वरून सोनवणे, संतोष साळी, संभाजी आवारी, दादाभाऊ नरवडे, ज्ञानेश्वर शेटे, संपत काळे, सागर कु-हाडे, गणेश आवारी, संतोष शिंदे आदी कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित शेतक-यांच्या वतीने वरूण सोनवणे म्हणाले की, काल पर्यंत कांद्याला एका किलोस ४०ते ५० रुपये बाजार भाव मिळत होता. परंतु केंद्र सरकारने निर्यात बंद केल्याने बाजार भाव उतरल्याने शेतक-यांनी आज निलाव बंद पाडले आहेत. भविष्यात जर कांद्याला चांगला भाव मिळाला नाही तर आळेफाटा येथील चौकात रास्ता रोको आंदोलन करणार आहोत असा कडक इशारा यावेळी दिला.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रितम काळे, धोंडीभाऊ पिंगट, धनेश संचेती, पांडुशेठ गाडगे, सचिव रुपेश कवडे, शाखा व्यवस्थापक प्रशांत महाबरे यांनी शेतक-यांच्या समस्या यावेळी समजुन घेऊन चर्चा करुन आधी झालेले लिलाव रद्द करुन अडतदारांना परत फेर लिलाव करण्याचा सुचना देवून शेतक-यांनी जवळपास तीन ते चार तास बंद पाडलेले कांदा लिलाव परत सुरु केले.

तसेच या संदर्भाचे निवेदन उपस्थित शेतक-यांनी आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे व वडगाव आनंदचे मंडलाधिकारी डी. बी. काळे यांना दिले.

प्रतिक्रिया -

अतुल बेनके, आमदार जुन्नर

आमदार बेनके केंद्र सरकारने निर्यात बंदीचा जो निर्णय घेतला आहे हा कांदा उत्पादक शेतक-यांवर अन्यायकारक असुन यांचा तालुक्याचा लोक प्रतिनिधी म्हणुन तीव्र शब्दांत निषेध करतो .राज्य सरकारने केंद्र सरकारला विनंती करून निर्यात बंदी उठवावी अशी माझी मागणी असुन विधानसभेत चालु अधिवेशनात मांडणार आहे.

प्रतिक्रिया -

प्रितम काळे, संचालक कृषी उत्पन्न बाजार समीती

केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंद केल्याने बाजारभाव उतरले असुन‌ आम्ही सर्व संचालक शेतक-यांच्या बाजुने असुन बाजार समितीने नेहमी शेतक-यांच्या हिताचे निर्णय घेतले आहे. दरम्यान या ठिकाणी परत घेण्यात आलेल्या कांदा निलावात जुन्या कांद्यास दहा किलोस ५५०. रुपये तर नविन कांद्यास दहा किलोस ३५० रुपये बाजारभाव मिळाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com