कांद्याच्या भावातील घसरणीत दिवसेंदिवस वाढ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

वाढती आवक आणि निर्यातबंदी यामुळे कांद्याच्या भावातील घसरण दिवसेंदिवस वाढत आहे. लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी झालेल्या लिलावात उच्च प्रतीच्या कांद्याला २५०० ते ३६५० रुपये, तर मध्यम कांद्याला १८०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. तीनच दिवसांत कांद्याचा भाव पाचशे ते एक हजार रुपये प्रतिक्विंटलने घसरला आहे. परिणामी निर्यातबंदी तातडीने उठवावी, अशी मागणी होत आहे.

सोमेश्वरनगर - वाढती आवक आणि निर्यातबंदी यामुळे कांद्याच्या भावातील घसरण दिवसेंदिवस वाढत आहे. लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी झालेल्या लिलावात उच्च प्रतीच्या कांद्याला २५०० ते ३६५० रुपये, तर मध्यम कांद्याला १८०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. तीनच दिवसांत कांद्याचा भाव पाचशे ते एक हजार रुपये प्रतिक्विंटलने घसरला आहे. परिणामी निर्यातबंदी तातडीने उठवावी, अशी मागणी होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कांद्याचा भाव सप्टेंबर-ऑक्‍टोबरमध्ये २५०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होता. केंद्र सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने निर्यातबंदी करण्याचा २९ सप्टेंबरला निर्णय घेत आयातीवर भर दिला. यानंतरही जानेवारीच्या मध्यापर्यंत तेजी कायम राहिली. पाऊस लांबल्याने कांद्याची उशिरा लागवड झाली. त्यामुळे डिसेंबरअखेर आवक वाढणे अपेक्षित असताना यंदा ती जानेवारीअखेर दुप्पट झाली आहे.

'राजमुद्रेचा गैरवापर केल्याप्रकरणी राज ठाकरेंविरुद्ध गुन्हा दाखल करावा' 

बारामती-पुरंदर व फलटण-खंडाळा तालुक्‍यांतून लोणंद बाजार समितीत जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात प्रतिबाजार आठशे पिशव्यांची आवक होत होती, आता ती दुपटीपेक्षा अधिक झाली आहे. आज उच्च कांद्याला २५०० ते ३६५० रुपये, मध्यम कांद्याला १८०० ते २५०० रुपये, तर छोट्या कांद्याला ९०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: onion rate decrease