कांदा माळरानावर फेकण्याची वेळ (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 जानेवारी 2019

टाकळी हाजी - पाणी व्यवस्थापन व उत्तम हवामानामुळे मागील हंगामात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करण्यात आली होती. कांद्याला बाजारभाव मिळेल या अपेक्षेने कांदा चाळीत साठवला होता. पण सध्या बाजारभाव मिळत नसल्याने शिरूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात सडत चाललेला कांदा आता माळरानावर फेकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.

दरवर्षी खरीप, लेट खरीप (रांगडा कांदा), रब्बी हंगामात (उन्हाळी कांदा) कांदा लागवड होते. बहुतांश शेतकरी रब्बी हंगामातील कांदा पिकाला अधिक प्राधान्य देतात. त्यामुळे रब्बी हंगामात दरवर्षी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड होते. खरीप हंगामात कांद्याची ऑगस्ट, लेट खरीप हंगाम कांद्याची सप्टेंबर ते ऑक्‍टोबर तर उन्हाळी कांदा लागवड डिसेंबर, जानेवारीमध्ये होते. बहुतांश शेतकरी एक ते दीड महिनाअगोदर गादी वाफावर रोपे तयार करून नंतर लागवड करतात. कांद्याची काढणी साधारण साडेतीन ते चार महिन्यांनी होते. त्यामुळे कमी कालावधीत शेतकऱ्यांच्या हातात पैसे येतात.

भाव नसल्यास काही शेतकरी कांद्याची साठवणूक करतात. पुणे जिल्ह्यात हवामान पोषक असल्याने अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड करतात. पुणे जिल्ह्यातील पूर्वेकडील शिरूर, खेड, बारामती, पुरंदर, दौंड तालुके कांदा लागवडीसाठी प्रसिद्ध आहेत. या भागात सर्वाधिक लागवड शिरूर तालुक्‍यात होते. पुणे विभागात रब्बी हंगामात ९४ हजार ९५ हेक्‍टरवर कांदा लागवड झाली आहे. यंदा नगर जिल्हा कांदा लागवडीसाठी अव्वल आहे. 

नुकसानभरपाई देण्याची मागणी
गेल्या वर्षी साठवणूक केलेला कांदा आता सडण्याच्या मार्गावर आहे. या कांद्याला बाजारात मातीमोल भाव आहे. कांदा आता जनावरांना खाण्यासाठी टाकून दिला जात आहे. सडल्याने जनावरे कांदा खात नसून तो माळ रानावर फेकावा लागत आहे. फेकून दिलेल्या कांद्याचा पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.

Web Title: Onion rate Decrease farmer Loss