पुणे : सफरचंदापेक्षा कांदा महाग; किलोला तब्बल एवढा भाव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

बाजारात कांद्याची आवक निम्म्याने घटली असल्याने जुना कांद्याला प्रतिक्विंटल १४ हजार रूपयांचा भाव मिळाला, तर नविन कांद्यास तब्बल १० हजार रूपये भाव मिळाला. तसेच किरकोळ बाजारात प्रति एक किलो कांद्याचां १६० रूपयांपर्यंत पोहचला आहे.

मार्केट यार्ड : बाजारात कांद्याची आवक निम्म्याने घटली असल्याने जुना कांद्याला प्रतिक्विंटल १४ हजार रूपयांचा भाव मिळाला, तर नविन कांद्यास तब्बल १० हजार रूपये भाव मिळाला. तसेच किरकोळ बाजारात प्रति एक किलो कांद्याचां १६० रूपयांपर्यंत पोहचला आहे. सध्या बाजारात सफरचंदाचाही भाव १३० रुपयांपेक्षा जास्त नसल्याने सफरचंदापेक्षा कांदा महाग झाल्याची चर्चा ग्राहकांमध्ये आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

कांदा बटाटा विभागात दररोज ३० ते ५० ट्रक कांद्याची आवक होत आहे. बुधवारी बाजारात जुना कांदा १६ ते १८ ट्रक तर, नविन कांद्याची २० ट्रक इतकी आवक झाली. इतरवेळी ही आवक सुमारे १०० ते १२० ट्रक असते. आज बाजारात नविन कांद्याला प्रतिदहा किलोस ७०० ते ११०० रूपये, तर जुना कांद्याल १००० ते १४०० रूपये भाव मिळाला, असल्याची माहिती मार्केट यार्डातील कांद्याचे व्यापारी गणेश यादव यांनी दिली.

पिंपरीच्या स्थायी सभेत गोंधळ

बाजारात नविन कांदा कमी प्रमाणात दाखल होत असून त्याचा दर्जाही फारसा चांगला नाही. पावसाने नविन कांद्याचे नुकसान होऊन त्याचा उत्पादनावर परिणाम झाला आहे. काही भागात शेतकरी कांदा भाववाढीमुळे लवकर काढणी करून कांदा बाजारात विक्रीस पाठवित आहेत. परंतु या कांद्याचा दर्जा, आकार चांगला नाही. परंतु मागणीच्या तुलने अत्यल्प कांद्याची आवक होत असल्याने भावात तेजी आहे. सध्या कांदा आयातीचे प्रमाण कमी आहे. पाऊस न झाल्यास सुमारे दीड महिन्यानंतर कांद्याची आवक वाढेल. तोपर्यंत कांद्याचे भाव तेजीत राहण्याचा अंदाजही यादव यांनी वर्तविला.

सिंचन घोटाळ्याचे गृहण अजित पवारांच्या नाहीतर फडणवीसांच्या मागे

यंदा अतिवृष्टीमुळे कांद्याच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. नविन लागवड केलेल्या कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. तसेच जुणा कांद्याही जवळपास संपल्यात जमा असल्याने बाजारात मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नाही. त्यामुळे शासनाने कांदा आयातीचा निर्णय घेतला. त्यानुसार इजिप्त, तुर्कस्थान या देशांतून कांदा आयातही करण्यात आला आहे. परंतु आयातीचे प्रमाण मागणीच्या तुलनेत कमी असल्याने बाजारात सध्या कांद्याच्या भावात प्रंचड तेजी आली आहे.

अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रावादीचा मोठा निर्णय; समिती स्थापन

कांद्याचे भाव वाढल्याने ग्राहक सध्या कांदा कमी खरेदी करत आहे. १ ते २ किलो कांदा खरेदी करणारा ग्राहक अर्धा किलो कांदा खरेदी करत आहे. आम्ही घाऊक बाजारात दोन तीन पोती कांदा खरेदी करायचो आता ती खरेदी ३०-४० कीलोवर आली आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर कांदा विक्री बंद करावी लागेल. सध्या किरकोळ बाजारात कांदा प्रती किलो दर्जानुसार जुना कांदा १६० आणि नवीन कांदा १३० रुपये आहे.
प्रकाश ढमेढेरे, किरकोळ विक्रेते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: onion rate in pune market yard 160 rs KG