पुणे : मार्केटयार्डात तुर्कस्थानचा कांदा दाखल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 डिसेंबर 2019

​तुर्कस्थानचा कांदा राज्यातील कांद्याच्या तुलनेत जवळपास सारखा असल्याने त्यास मागणी आणि भाव चांगला मिळत आहे. तुर्कस्थानी कांद्याला घाऊक बाजारात प्रति दहा किलोस ८०० रुपये भाव मिळत आहे. तर किरकोळ बाजारात एक किलो कांदा १०० ते १२० रूपयांवर पोहचला आहे.

पुणे  : मार्केट यार्ड बाजारात तुर्कस्थानमधून कांदा दाखल झाला आहे. कांद्याच्या वाढलेल्या भावावर नियत्रंण आणण्यासाठी शासनाने कांदा आयातीचा निर्णय घेतल्यानंतर विविध बाजारपेठांमध्ये परदेशातील कांदा दाखल झाला आहे.

पुणे- नाशिक रस्त्याची वाहतूक कोंडी सुटणार कधी...

तुर्कस्थानचा कांदा राज्यातील कांद्याच्या तुलनेत जवळपास सारखा असल्याने त्यास मागणी आणि भाव चांगला मिळत आहे. तुर्कस्थानी कांद्याला घाऊक बाजारात प्रति दहा किलोस ८०० रुपये भाव मिळत आहे. तर किरकोळ बाजारात एक किलो कांदा १०० ते १२० रूपयांवर पोहचला आहे.

पुण्यासह 'या' पाच ठिकाणी असणार एसटीच्या 'ई-बस चार्जिंग स्टेशन...

कांद्याचे व्यापारी गणेश शेडगे म्हणाले, परदेशातील आजपर्यंत जो कांदा पुणे बाजार समितीमध्ये आला त्यापैकी तुर्कस्थानच्या कांद्याला मिळणारा भाव हा उच्चांकी आहे. तुर्कस्थांनी कांद्याचा दर्जा, आकार, रंग आणि गुणधर्म देखील आपल्या स्थानिक कांद्याशी मिळतेजुळते असल्याने पहिल्याच दिवशी चार पैकी दोन ते तीन कंटेनर कांद्याची विक्री झाली. परदेशातून आयात केलेल्या कांद्यापैकी तुर्कस्थानचा कांदा दजेर्दार असून त्यास मागणीही चांगली आहे. हा कांदा महाराष्ट्रातील जुन्या कांद्याप्रमाणे दिसणारा आहे. मार्केट यार्डात मुंबईमार्गे तुर्कस्थानातील कांद्याची आवक झाली आहे. बाजारात गणेश शेडगे आणि अल्ताफ पटेल या दोन कांदा व्यापाऱ्यांकडे प्रत्येकी ६० टन अशी ही आवक झाली आहे. 

धरण होऊन नऊ वर्षे झाली, पण पाण्याचा पत्ताच नाही... 

राज्यातील जुन्या कांद्याची १५ ट्रक इतकी आवक झाली. बाजारात स्थानिक जुन्या कांद्यास दहा किलोस ६०० ते ९०० रुपये भाव मिळाला. तर, नवीन हळवी कांद्याचा हंगाम सुरु झाला असून नगर जिल्ह्यातील कर्जत, जामखेड आणि श्रींगोदा परिसरातून नविन कांद्याची आवक होत असून आज नवीन कांद्याची ३५ ते ४० ट्रक इतकी आवक झाली. नविन कांद्याला प्रति दहा किलोस ४०० ते ६५० रूपये भाव मिळत आहे. 

पुण्यासह 'या' पाच ठिकाणी असणार एसटीच्या 'ई-बस चार्जिंग स्टेशन...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion from Turkistan at Market Yard in pune