पुण्यासह 'या' पाच ठिकाणी असणार एसटीच्या 'ई-बस चार्जिंग स्टेशन' 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 डिसेंबर 2019

बॅटरी चार्जिंग केल्यानंतर ही बस किमान 300 किमीचा पल्ला गाठू शकते. त्यानुसार एसटीने प्राथमिक मार्ग निश्‍चित केले आहेत. प्रामुख्याने पुण्यासह नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर व बोरिवली या ठिकाणांना प्राधान्य देण्यात आले आहे. बसची सुरवात आणि बसचे ठिकाण, अशा दोन ठिकाणी स्वतंत्र चार्जिंग स्टेशन उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. दोन्ही ठिकाणी चार्जिंग स्टेशन कार्यान्वित झाल्यानंतरच प्रत्यक्ष मार्गावर बस धावू शकेल

पुणे : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या एसटी महामंडळाच्या 'शिवाई' या इलेक्‍ट्रिक बसच्या मार्गांना प्राथमिक मंजुरी मिळाली आहे. पहिल्या टप्प्यात पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर आणि बोरिवली या विभागांद्वारे ही सेवा पुरविली जाणार आहे. त्यासाठी पाचही ठिकाणी सध्या 'ई-बस चार्जिंग' स्टेशन उभारण्याच्यादृष्टीने तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 

भूत्याबाबा परंपरा जोपासण्यासाठी "एक कदम'

बॅटरी चार्जिंग केल्यानंतर ही बस किमान 300 किमीचा पल्ला गाठू शकते. त्यानुसार एसटीने प्राथमिक मार्ग निश्‍चित केले आहेत. प्रामुख्याने पुण्यासह नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर व बोरिवली या ठिकाणांना प्राधान्य देण्यात आले आहे. बसची सुरवात आणि बसचे ठिकाण, अशा दोन ठिकाणी स्वतंत्र चार्जिंग स्टेशन उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. दोन्ही ठिकाणी चार्जिंग स्टेशन कार्यान्वित झाल्यानंतरच प्रत्यक्ष मार्गावर बस धावू शकेल. 

माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी रुग्णालयात दाखल; डोक्याला झाली इजा

शहरांतर्गत वाहतुकीसाठी लांब पल्याच्या मार्गावरही ई-बस चालविण्याचे प्रयत्न केले जात आहे. त्याअंतर्गत शहरात "पीएमपी'च्या ताफ्यात 150 'ई-बस' दाखल झाल्या आहेत. टप्याटप्याने ही संख्या चौपट होणार आहे. पीएमपीनंतर आता प्रदूषणाला आळा घालण्यासाठी एसटी देखील ई-वाहनांना प्राधान्य देत असून त्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून नियोजन केले जात आहे. 

देहूत खड्ड्यात पुरलेले अर्भक नसून कुत्रे  

'एसटी'नेही पहिल्या टप्प्यात शंभर ई-बस भाडेतत्त्वावर घेण्याचे ठरविले आहे. त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तर केंद्र सरकारच्या 'फेम इंडिया' योजनेअंतर्गत एसटीला 50 ई- बस मिळणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीला पहिल्या ई- बसचे 'शिवाई' असे नाव देत लोकार्पण करण्यात आले. 

 Video : मजूराचा पाय बाहेर खेचणार तेवढ्यात आम्ही देखील गाडले गेलो....  

सर्व प्रक्रियेसाठी दोन महिने लागणार 
ई- बस भाडेतत्त्वावर घेतल्या जाणार आहे. या सर्व प्रक्रियेसाठी दीड-दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. निवडणुका झाल्यानंतर बस मार्गस्थ करण्यासाच्या प्रक्रियेला वेग आला असून काही दिवसांपूर्वी मुंबई ते पुणेदरम्यान ई-बसची चाचणीही घेण्यात आली आहे. ही चाचणी यशस्वी ठरल्याचे अधिका-यांनी सांगितले. केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थे (सीआयआरटी) कडूनही या सेवेला हिरवा कंदील आहे. 

Video : पुण्यातील फुगेवाडी दुर्घटनेचा असा घडला थरार!

ई-बसचे संभाव्य मार्ग - 
- पुणे-नाशिक-पुणे 
- पुणे-औरंगाबाद-पुणे 
- पुणे-कोल्हापूर-पुणे 
- पुणे-बोरिवली-पुणे 
- नाशिक-बोरिवली-नाशिक  
जेजुरीच्या चंपाषष्ठी उत्सवात असे भरले रंग...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST e-bus charging station will be in five locations including Pune