ऑनलाइन तक्रारींचा पाऊस

Online-Complaint
Online-Complaint

पिंपरी - नागरिकांना आपले प्रश्‍न मांडता यावेत, यासाठी महापालिकेने सुरू ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर ‘वाढता वाढता वाढे’ या उक्तीप्रमाणे प्रचंड प्रमाणात तक्रारी पडत आहे. किंबहुना, दिवसेंदिवस तक्रारींचा हा आलेख चढताना दिसत आहे.

पूर्वी नागरिकांना आपली तक्रार स्थानिक नगरसेवकाकडे नोंदवावी लागत होती. अथवा महापालिकेकडे लेखी अर्ज द्यावा लागत असे. मात्र २०१३ मध्ये तत्कालीन आयुक्‍त श्रीकर परदेशी यांनी ‘सारथी’ ही हेल्पलाइन सुरू केली.

त्यामुळे नागरिक दूरध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवू लागले. डॉ. परदेशी जातीने या तक्रारीचे निराकरण करत किंवा त्याचा आढावा घेत होते. प्रत्येक आठवड्याला ते त्या संदर्भातील माहिती मागवायचे. त्यामुळे अधिकारीही नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य देऊ लागले. अल्पावधीतच देशभरात ‘सारथी’चा गौरव झाला. त्यानंतर वेबपोर्टल, एसएमएस, ई-मेल, किऑक्स, मोबाईल ॲप आणि सोशल मीडियावरूनही तक्रार स्वीकारण्यास सुरवात झाली. 

२६ जानेवारी २०१७ पासून राज्य सरकारनेही ऑनलाइन तक्रारींकरिता ‘आपले सरकार’ हे पोर्टल सुरू केले. या पोर्टलवर आलेल्या तक्रारी संबंधित विभागाकडे पाठविल्या जात आहेत. गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत या पोर्टलवरून चार हजार ८१ तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या आहेत. तर, एक जानेवारी २०१८ पासून पंतप्रधान कार्यालयानेही वेबपोर्टल सुरू करून नागरिकांच्या ऑनलाइन तक्रारी घेण्यास सुरवात केली. गेल्या दीड वर्षांत पंतप्रधान कार्यालयाच्या वेबपोर्टलवरून पिंपरी-चिंचवड महापालिकेला ३८५ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापैकी काही तक्रारी पिंपरी-चिंचवडकरांनी महापालिका, राज्य आणि केंद्र सरकारकडेही नोंदविल्या आहेत. शासनाकडून आलेल्या तक्रारींची पूर्तता केल्याचा अहवाल महापालिका सरकारला पाठवीत आहे. गेल्या वर्षभरात दोन लाख ५६ हजार ७७९ तक्रारी प्राप्त झाल्याची नोंद महापालिकेने तक्रारींकरिता स्थापन केलेल्या सेंट्रल डेस्ककडे केली आहे. यामध्ये सर्वाधिक तक्रारी सारथी हेल्पलाइनवर आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com