दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी आता ऑनलाइन शिक्षण

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 June 2020

शिक्षणाबरोबर मदतीचा हात
‘निवांत अंधमुक्त विकासालया’त असलेले दृष्टिहीन विद्यार्थी विविध भागांतून आलेले आहेत. सध्या कोरोनामुळे ते आपापल्या घरी आहेत. संस्थेत असताना त्यांना सर्व सुविधा पुरविण्यात येत होत्या. मात्र काही विद्यार्थ्यांची घरची परिस्थिती हलाखीची आहे. संस्थेच्या वतीने अशा विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना रेशन पुरविण्यात येत आहे.

पुणे - गेल्या अनेक वर्षांपासून दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी मायेचा आसरा असलेल्या ‘निवांत अंधमुक्त विकासालया’तील सर्व विद्यार्थ्यांना सध्या कोरोनामुळे आपापल्या घरी पाठवले आहे. मात्र त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. केवळ शालेय, महाविद्यालयीन नव्हे; तर स्पर्धा परीक्षेच्या तयारीकरिताही ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्या तीन महिन्यांपासून संस्थेतील सुमारे १०० मुलांचे ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांपर्यंत सर्व जण या उपक्रमात सहभागी झाले आहेत. त्यांना इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, गणित अशा विषयांच्या पुस्तकातील धडे ऑडिओ स्वरूपात रेकॉर्ड करून त्याची लिंक व्हॉट्‌सॲपवर पाठविली जाते. धडे वाचून रेकॉर्ड करण्यासाठी ३० महिला स्वयंसेवकांची नेमणूक केली आहे. आठ शिक्षकांचा समावेश असून, यामध्ये दोन दृष्टिहीन शिक्षकही आहेत. शिक्षक धडे रेकॉर्ड करतात. ऑडिओ स्वरूपातच गृहपाठासाठी प्रश्नही पाठवले जातात. 

अजित पवारांच्या बैठकीकडे शहरातील सोसायट्यांचे लक्ष; का? वाचा सविस्तर!

गृहपाठासाठी ‘स्वलेखन ॲप’
दरम्यान, संस्थेच्या ‘स्वलेखन ॲप’च्या माध्यमातून विद्यार्थी प्रश्नांची उत्तरे टाइप करून पाठवतात. ॲपमुळे विद्यार्थ्यांना टाइप करताना अडचण येत नाही, अशी माहिती संस्थेच्या सदस्या उमा बडवे यांनी दिली. सर्व विद्यार्थी ऑडिओ क्‍लीप ऐकून गृहपाठ करत आहेत की नाही, यावर लक्ष दिले जाते. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे बडवे यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online education for blind students now