
पुणे : पुण्यात अडकून पडलेल्या मजूर आणि कामगारांचा गावी जाण्याचा मार्ग आता काहीसा सुकर होणार आहे. प्रवासासाठी पास आणि इतर बाबींसाठी कामगारांना करावी लागणारी उठाठेव कमी करण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी जाण्याची परवानगी दिल्यानंतर त्यासाठी आवश्यक असलेला पास आणि वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवण्यासाठी शहरातील पोलिस ठाण्यात रांगा लागत होत्या. त्यासाठी वेळ जात असल्याने हे कामगार अगदी दिवस-रात्र पास मिळण्याच्या प्रयत्नात असल्याचे पहायला मिळत होते. रेल्वेचे तिकीट, प्रवासाचा पास किंवा वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवून देण्याच्या आमिषाने अनेक कामगारांची लुबाडणूक झाल्याच्या तक्रारीदेखील दाखल आहेत. गाडीतळ परिसरात फसवणूक करणारी टोळीच सक्रिय झाली होती. जस्ट डायलच्या वापरातून त्यांनी अनेकांना गंडा घातल्याचे उघड झाले आहे. या सर्व प्रकारांमुळे आधीच अडचणीत असलेल्या कामगारांची अगतिकता अधिक वाढत होती. दोन ते तीन हजार रुपये मोजून देखील प्रवासासाठी आवश्यक बाबी मिळत नसल्याने अनेकांनी खाजगी वाहनाने जाण्याचा पर्याय निवडला काही. तर काही दुचाकी व सायकलवर गावी निघाले. त्यांच्याकडे अगदीच पैसा नाही असे कुटुंब पायी गावी जात असल्याचे अनेक रस्त्यांवर पाहायला मिळाले. कामगारांची ही गैरसोय टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने कामगार विभागाला सर्वांचे नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार कामगारांसाठी ही ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अशी असेल प्रक्रिया
गावी जाण्यासाठी इच्छुक असलेल्या स्थलांतरित मजूर व कामगारांनी मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज केल्यानंतर कामगार विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून अर्जदाराची तापसणी केली जाईल. तो स्थलांतरित कामगार असल्याची खात्री पटल्यावर ती माहिती जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे पाठवली जाईल. कामगारांना ज्या राज्यात जायचं आहे. तेथील परवानगी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत घेतली जाईल. तिकडून परवानगी मिळाल्यानंतर अर्जदार कामगारांला परत पाठवण्याची सोय केली जाईल.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मंडळाच्या संकेतस्थळावर ही सुविधा ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. पूर्वी पोलिसांमार्फत ही प्रक्रिया होत. ऑनलाइन अर्जाची पडताळणी झाल्यानंतर व संबंधित राज्याने परवानगी दिल्यावर कामगाराला जाता येईल. स्थलांतरित कामगारांनाच या ठिकाणी अर्ज करता येणार आहे. विद्यार्थी, भाविक, पर्यटक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी सध्या आहे तीच प्रक्रिया सुरू आहे.
- विकास पनवेलकर, उपआयुक्त, कामगार विभाग
या संकेतस्थळावर करता येणार अर्ज :
https://migrant.mahabocw.in/migrant/form
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.