अकरावी अॅडमिशन : ऑफलाइन प्रवेशाच्या माहिती संकलनासाठी ऑनलाइन फॉर्म

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 11 October 2020

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच ग्रामीण भागात अकरावीचे ऑफलाइन प्रवेश सुरू झाले. आतापर्यंत बहुतांश ठिकाणी प्रवेश प्रक्रिया पूर्णही झाली आहे.

पुणे : ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयात आतापर्यंत अकरावीचे किती प्रवेश झाले ही माहिती घेण्यासाठी शिक्षण विभागाने विशेष मोहिम सुरू केली आहे. या अंतर्गत कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीच्या ऑफलाइन प्रवेशाची माहिती गुगल फॉर्मद्वारे ऑनलाइन पद्धतीने संकलित केली जात आहे. आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील जवळपास ४०० कनिष्ठ महाविद्यालयांपैकी केवळ ४५ महाविद्यालयांनी ही माहिती भरली आहे.

डीएसके प्रकरण : उलाढालीचा रिपोर्ट अडकला लालफितीत; तपास यंत्रणेकडून दिरंगाई​

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच ग्रामीण भागात अकरावीचे ऑफलाइन प्रवेश सुरू झाले. आतापर्यंत बहुतांश ठिकाणी प्रवेश प्रक्रिया पूर्णही झाली आहे. परंतु मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने ही प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र आतापर्यंत झालेल्या अकरावीच्या प्रवेशाची माहिती न्यायालयासमोर सादर करण्यासाठी हे ग्रामीण भागातील अकरावी प्रवेशाचा आढावा घेतला जात असल्याचे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) गणपत मोरे यांनी स्पष्ट केले.

पुणे विद्यापीठाचा महत्त्वाचा निर्णय; ऑफलाइन परीक्षा केंद्रांवर नसणार 'स्क्वॉड'!​

पुणे जिल्ह्यातही पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड वगळता अन्य भागातील प्रवेशाची माहिती संकलित केली जात आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात असणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांपैकी जवळपास निम्म्याहुन अधिक महाविद्यालयात अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असण्याची शक्यता आहे. त्याशिवाय १५ ते २० टक्के महाविद्यालयांमध्ये अकरावीचे ऑनलाइन वर्ग देखील सुरू झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. परंतु संकलित केलेल्या माहितीतून चित्र अधिक स्पष्ट होईल, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे.

स्पर्धा परीक्षेचा पेच सुटणार का? विद्यार्थ्यांसमोर एकच प्रश्‍न

- पुणे जिल्हा ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या : ४००
- अकरावी प्रवेशाच्या जागा : जवळपास एक लाखाहुन अधिक
- प्रवेशाची पद्धत : ऑफलाइन
- दहावीचा निकाल लागल्यानंतर अवघ्या दोन-तीन आठवड्यात प्रवेशाची प्रक्रिया होते पूर्ण
- काही महाविद्यालयांमध्ये ऑनलाइनद्वारे अकरावीचे वर्ग सुरू

- पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online form for offline access information collection