बनावट फेसबूक अकाउंट काढून उकळले पैसे 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 16 October 2020

आपल्या नावाने बनावट अकाउंट काढून मित्रांकडे पैसे मागून फसवणूक करण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर ऍड. निकम यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल दिली.

पुणे : वकिलाच्या नावाने बनावट फेसबूक अकाउंट काढून त्यांच्या मित्रांना तातडीने पैशांची गरज असल्याचे मेसेज पाठवून पैसे उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ऍड. विजयसिंह निकम यांनी चतुःशृंगी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मित्राला तातडीने पैशांची गरज असल्याचा मेसेज आल्यानंतर ऍड. निकम यांच्या एका मित्राने रात्री एक वाजता 35 हजार रुपये ऑनलाइनद्वारे सांगितलेल्या अकाउंटवर ट्रान्स्फर केले. मात्र हे पैसे बनावट अकाउंटद्वारे लाटल्याचे समोर आले आहे. याबाबत दिलेल्या तक्रारीनुसार, ऍड. निकम यांच्या नावाने एका भामट्याने बनावट अकाउंट काढले. त्यानंतर ऍड. निकम यांच्या फेसबुकवरील विविध मित्रांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून तातडीने 35 हजार रुपयांची गरज असल्याचे मेसेज पाठविण्यात आले. त्यानुसार त्यांच्या एका मित्राने भामट्याने दिलेल्या खात्यावर 35 हजार रुपये पाठवले. आपल्या नावाने बनावट अकाउंट काढून मित्रांकडे पैसे मागून फसवणूक करण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर ऍड. निकम यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल दिली. फेसबुकवरील प्रतिष्ठित नागरिकांच्या नावाने बनावट फेसबूक अकाउंट काढून अशाप्रकारे पैसे मागून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. अशा प्रकारच्या फसवणुकीचा फटका माझ्या मित्राला बसला असल्याचे ऍड. निकम यांनी सांगितले.

 पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हेही वाचा : पुणे : भिडे पुलावर सेल्फी घेणारे दोघे नदीत पडून वाहून गेले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: online fraud by fake facebook account

Tags
टॉपिकस
Topic Tags: