आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरीच्या बहाण्याने आठ जणांना ऑनलाइन गंडा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी लावण्याच्या आमिषाने तिघांनी मिळून आठ तरुणांना चार लाख 62 हजारांचा ऑनलाइन गंडा घातल्याचे उघड झाले आहे. ही घटना 28 ऑगस्ट 2019 पासून खराडी येथे घडली. याप्रकरणी एका तरुणीने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुणे - आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी लावण्याच्या आमिषाने तिघांनी मिळून आठ तरुणांना चार लाख 62 हजारांचा ऑनलाइन गंडा घातल्याचे उघड झाले आहे. ही घटना 28 ऑगस्ट 2019 पासून खराडी येथे घडली. याप्रकरणी एका तरुणीने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि प्रेम गायकवाड, सागर व्यवहारे, सागर पवार, शेखर पवार, शुभम चवरे, विकास जाधव, अरविंद जाधव यांचे पदव्युत्तर शिक्षण झाले आहे. त्यांनी फॉर्टिनेट या आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरीसाठी अर्ज केला होता. त्या वेळी एका महिलेसह तिघांनी मिळून फिर्यादीसह आठ जणांना नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी वेगवेगळ्या चार्जेसच्या नावाखाली त्यांनी चार लाख 62 हजार रुपये ऑनलाइन वर्ग करून घेतले. रक्कम स्वीकारून तिघांनी आठ जणांना आरआरव्ही टेक्‍नो या कंपनीत नोकरीला लावले. संबंधित कंपनीने तरुणांकडून काम करून घेत त्यांचा पगार दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक के. व्ही. वराळ करीत आहेत. 

चक्क झेडपी शाळेसाठी विद्यार्थ्यांचे वेटिंग, कुठे आहे ही शाळा?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: online fraud in pune